Personal Loan : हल्ली अनेकजण लोन घेतात. पण त्यांची परतफेड वेळेत न करता आल्याने अनेकजण आर्थिक संकटात येतात. अशावेळी जर तुम्ही कर्ज घेत असाल तर त्यापूर्वी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. नाहीतर तुम्ही संकटात याल.
क्रेडिट स्कोअर
तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी जाता त्यावेळी तुमचा क्रेडिट स्कोअर विचारात घेतला जातो. तुम्ही कर्जासाठी अर्ज करणार असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास तुम्हाला महागड्या व्याजदराने कर्ज मिळेल. वैयक्तिक कर्जासाठी काही अटी आहेत जसे की तुमचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपये पाहिजे.
व्याजदरांची तुलना
कर्ज घेताना सर्व बँकांच्या व्याजदरांची तुलना करा. वैयक्तिक कर्जावरील व्याज 11 टक्के ते 24 टक्के असण्याची शक्यता असते. कर्ज घेण्यापूर्वी, आपण अनेक बँकांना भेट द्यावी. बँकांच्या व्याजदरांची तुलना करता येईल. व्याज कमी असल्यास लगेचच तिथून कर्ज घ्या. यामुळे तुमचा EMI कमी होईल. व्याज जितके जास्त असेल तितका मोठा EMI असतो.
EMI चा हप्ता
कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता वेळेवर फेडा. तुम्ही असे केले नाही तर, तुमचा CIBIL स्कोर खराब होईल आणि तुमच्या भविष्यात कर्ज घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होईल.
क्षमतेनुसार कर्ज घ्या
हे लक्षात घ्या की वैयक्तिक कर्ज घेताना तुम्ही तुमच्या कर्जाच्या रकमेकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. आजकाल बँकांचे कर्ज कॅल्क्युलेटर नेटवर उपलब्ध असून त्यांच्याद्वारे तुम्हाला किती रकमेवर किती ईएमआय येईल याची कल्पना येईल. तुम्ही सहजपणे भरू शकणाऱ्या EMI नुसार कर्जाची रक्कम ठरवा.
जास्त काळ कर्ज घेणे टाळा
हे लक्षात घ्या की वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त पाच वर्षांचा कालावधी देण्यात येतो. अनेक वेळा असे होते की लोक ईएमआय कमी करण्यासाठी कर्जाचा कालावधी वाढवत असतात. पण यामुळे तुमचे नुकसान होते. तुमचा ईएमआय लहान असू शकतो, पण तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.