Personal Loan : पर्सनल लोन EMI चं ओझं कमी करायचंय? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Personal Loan : जरी पर्सनल लोनची निवड करणे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे किचकट नसले तरी अनेकजण EMI च्या ओझ्याखाली अडकतात. हे लक्षात घ्या की अचूक माहिती मिळवणे पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटरमुळे खूप सोयीस्कर होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची परफेड किती असेल हे समजून घेण्यासाठी पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटरचा वापर करू शकता.

हे लक्षात घ्या की वैयक्तिक कर्ज तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत खूप फायदेशीर ठरते. यात कोणतीही हमी नसते. इतकेच नाही तर इतर कर्जाच्या तुलनेत ते सहज उपलब्ध असते. पण यात सर्वात जास्त व्याजदराने ईएमआय भरावा लागतो. अशा वेळी ईएमआय कसा कमी करायचा याचे मार्ग आहेत. तुम्ही त्यांच्या मदतीने EMI चा भार कमी करू शकता.

कर्जाची निवड

अनेक वेळा लोक अशा काही कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेत असतात. जिथे ते वैयक्तिक कर्जाच्या जागी दुसरे स्वस्त कर्ज घेता येते. वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध असल्याने अनेकजण ते निवडतात. उदाहरणार्थ, समजा जर तुम्ही तुमच्या घराच्या दुरुस्तीसाठी कर्ज घेण्याचा विचारात असल्यास तर तुम्ही फक्त गृहकर्ज घ्या. यासाठी तुम्ही पर्सनल लोन घेतले तर ते तुम्हाला खूप महागात पडेल.

असा कमी करा EMI चा ताण

तुमच्याकडे वैयक्तिक कर्ज असेल आणि ईएमआयमुळे त्रास होत असेल तर तुमच्याकडे कर्ज शिफ्ट करण्याचा पर्याय आहे. तुम्हाला तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत शिफ्ट करून कमी व्याजाचा लाभ घेता येतो. इतकेच नाही तर तुम्ही कर्ज प्रीपेमेंट निवडू शकता.

कर्जाच्या प्रीपेमेंटमध्ये, तुमच्या कर्जाची मूळ रक्कम कमी होते आणि EMI प्रमाण कमी करण्यासोबत, कर्जाचा कालावधी देखील खूप कमी होतो. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे नियोजन केलं तर तुमच्यावर असणारा EMI चा ताण कमी होऊ शकतो.

Leave a Comment