Pension Schemes : सरकारच्या अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला गुंतवणूक करता येते. या सरकारी योजनेतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तुमचा वृद्धापकाळ या योजनेच्या माध्यमातून आरामात जाऊ शकतो. पहा त्यांची यादी.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना सरकार चालवत असून ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन मिळेल. या योजनेंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना 60 ते 79 वर्षे वयोगटातील 300 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन देण्यात येते. यानंतर, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना 500 रुपये पेन्शन म्हणून मिळतात.
एलआयसी पेन्शन योजना
वार्षिक हमी पेन्शन योजना एलआयसीद्वारे चालवण्यात येते. यात एकरकमी रक्कम भरल्यानंतर तुम्हाला हमी पेन्शन दिली जाते. यामध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर १५ वर्षांनी रक्कम काढता येते. हमी परताव्यामध्ये काही फरक असेल तर सरकार अनुदान देते.
अटल पेन्शन योजना
असंघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, गरीब आणि वंचितांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. यात तुम्ही प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. 1 ऑक्टोबर 2022 नंतर करदात्याला या योजनेत सहभागी होता येणार नाही. 18 ते 40 वर्षे वयाच्या कोणत्याही पात्र भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करता येतो.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली
केंद्र सरकारने बचतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरू केली असून यात गुंतवलेल्या रकमेवर नियंत्रित बाजार आधारित आणि सुरक्षित परतावा दिला जातो. PFRDA प्रमाणे त्याचे व्यवस्थापन करण्यात येते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे वृद्धापकाळ सुरक्षित करू शकता.