Israel-Gaza War : गाझामध्ये पुन्हा येणार शांतता? रमजानमध्ये युद्धबंदीचा ठराव मंजूर! वाचा सविस्तर

Israel-Gaza War : गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांनाचा मुत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेघर झाले आहेत. गाझामध्ये लोकांना अन्न, झोप आणि उपचार मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. मात्र आता सुरु असणाऱ्या रमजानच्या या पवित्र महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचा ठराव मंजूर केला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पवित्र रमजान महिन्यात गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचा ठराव मंजूर करून अनेकांना दिलासा दिला आहे. 15 राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने 10 अस्थायी निवडून आलेल्या सदस्यांनी मांडलेला ठराव स्वीकारला. 14 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर अमेरिका अनुपस्थित राहिला.

सर्व ओलिसांची बिनशर्त सुटका होणार 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सुरक्षा परिषदेने गाझावरील दीर्घ-प्रतीक्षित ठराव मंजूर केला, ज्यामध्ये तात्काळ युद्धविराम आणि सर्व ओलीसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याचे आवाहन केले गेले. हे नियम लागू केले जावेत असे म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी सांगितले की, रमजानच्या महिन्यात आपण पुन्हा शांतता प्रस्थापित केली पाहिजे यावर हा ठराव जोर देतो. MAS करार स्वीकारून हे करू शकते. ओलिसांच्या सुटकेसह युद्धविराम त्वरित लागू होऊ शकतो. त्यामुळे आम्ही हमासवर तसे करण्यासाठी दबाव आणला पाहिजे, असे ते म्हणाले. युद्धविराम आणि ओलीसांची सुटका सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, ज्याची आज आपण सर्वांनी मागणी केली आहे.

ग्राहकांना होणार फायदा! बाजारात येत आहे ‘ह्या’ 3 शानदार कार्स

संयुक्त राष्ट्रातील ब्रिटनच्या कायमस्वरूपी राजदूत बार्बरा वुडवर्ड यांनी सांगितले की, त्यांचा देश दीर्घकाळापासून कायमस्वरूपी युद्धविरामासाठी मानवतावादी आधारावर संघर्ष त्वरित संपवण्याची मागणी करत आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांची तात्काळ सुटका करण्यावरही त्यांनी भर दिला.

Leave a Comment