Paytm Payments । वापरकर्त्यांनो, 15 मार्चनंतर पेटीएमच्या ‘या’ सेवा राहणार बंद; पहा यादी

Paytm Payments । मोठ्या प्रमाणावर पेटीएमचा वापर केला जातो. पेटीएम पेमेंट्समुले अनेक कामे सोयीस्कर होतात. जर तुम्हीही पेटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण पेटीएमच्या काही सेवा 15 मार्चनंतर बंद होणार आहेत.

15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवर कोणताही व्यवहार स्वीकारला जाणार नाही. बँकेने ग्राहकांना पेटीएम पेमेंट्स बँकेत असणारी रक्कम इतर कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा सल्ला दिला आहे. पेटीएम पेमेंटवर बंदी घातल्यानंतर कोणत्या सेवा सुरू राहतील आणि कोणत्या सेवा बंद होतील याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. पेटीएमवर15 मार्च 2024 नंतर कोणती सेवा बंद केली जाईल ते जाणून घ्या.

ही सेवा राहणार बंद

  • 15 मार्चनंतर, वापरकर्त्यांना पेटीएम पेमेंट्स बँकेवर कोणतेही पेमेंट मिळणार नाही.
  • 15 मार्चनंतर, वापरकर्त्यांना पेटीएम पेमेंट्स बँकेतून त्यांचे खाते, फास्टॅग किंवा वॉलेट टॉप अप करता येणार नाही. 15 मार्चनंतर ही सेवा बंद होईल.
  • वापरकर्त्याला पेटीएम पेमेंट्स बँकेवर पगार किंवा इतर कोणत्याही पैशांचा लाभ मिळत असल्यास त्याला 15 मार्च नंतर हा लाभ मिळणार नाही. तसेच १५ मार्चनंतर पेटीएम फास्टॅगमधील शिल्लक दुसऱ्या फास्टॅगमध्ये ट्रान्सफर करता येणार नाही आणि UPI किंवा IMPS द्वारे पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात कोणतेही पैसे हस्तांतरित देखील करता येणार नाही.

ही सेवा राहणार सुरु

  • 15 मार्चनंतर वापरकर्त्यांना पेटीएम वॉलेटमधून पैसे काढू किंवा जमा करता येईल.
  • 15 मार्च 2024 नंतर पेटीएमच्या अनेक सेवा बंद केल्या जाणार आहेत. वापरकर्ते 15 मार्चनंतरही काही सेवांचा लाभ घेऊ शकतील. या सेवांचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला पेटीएमवर दुसरे बँक खाते लिंक करावे लागणार आहे.
  • पेटीएमद्वारे पेमेंटकेले तर वापरकर्त्यांना कॅशबॅक, रिफंड किंवा रिवॉर्ड यासारखे इतर सर्व फायदे मिळतील.
  • 15 मार्चनंतरही जर पेटीएम पेमेंट्स बँकेत रक्कम उपलब्ध असल्यास वापरकर्ता ती रक्कम वापरू शकतो.
  • पेटीएम वॉलेटद्वारे व्यापाऱ्याला सहज पेमेंट करता येईल.
  • पेटीएम वापरकर्त्यांकडे वॉलेट बंद करण्याचा किंवा रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय मिळेल.
  • वापरकर्त्यांना UPI आणि IMPS द्वारे सहजपणे ऑनलाइन पेमेंट करता येईल.

Leave a Comment