Paris Olympics 2024 Schedule : पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताची मनू भाकरने जबरदस्त कामगिरी करत 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. तर आज तिसऱ्या दिवशी भारताला आणखी दोन पदक मिळणार असल्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत सोमवारी बॅडमिंटन, हॉकी, टेबल टेनिस आणि तिरंदाजीमध्ये आपले आव्हान सादर करेल, परंतु सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा नेमबाजीवर असतील. मनू भाकर पुन्हा एकदा 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळताना दिसणार आहे.
10 मीटर एअर रायफल प्रकारात पुरुष गटात अर्जुन बबुता आणि महिला गटात रमिता जिंदाल अंतिम फेरीत पदकाचे लक्ष्य ठेवताना दिसतील. चला मग जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी भारताचा संपूर्ण कार्यक्रम
तिरंदाजी:
पुरुष सांघिक उपांत्यपूर्व फेरी: तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव – संध्याकाळी 6.30
बॅडमिंटन:
पुरुष दुहेरी (ग्रुप स्टेज): सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल (जर्मनी) – दुपारी 12 वा.
महिला दुहेरी (ग्रुप स्टेज): अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा (जपान) – दुपारी 12:50 वा.
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध ज्युलियन कॅरेजी (बेल्जियम) – संध्याकाळी 5:30
शूटिंग:
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता: मनू भाकर आणि सरबज्योत सिंग, रिदम सांगवान आणि अर्जुन सिंग चीमा – दुपारी 12:45 वा.
पुरुष ट्रॅप पात्रता: पृथ्वीराज तोंडैमन – दुपारी 1:00 वा
10 मीटर एअर रायफल महिला अंतिम फेरी: रमिता जिंदाल – दुपारी 1:00 वा
10 मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी: अर्जुन बबुता – दुपारी 3.30 वा
हॉकी:
पुरुषांचा पूल ब सामना: भारत विरुद्ध अर्जेंटिना – दुपारी 4.15
टेबल टेनिस:
महिला एकेरी (32 ची फेरी): श्रीजा अकुला विरुद्ध जियान झेंग (सिंगापूर) – रात्री 11:30.