Parbhani Lok Sabha : परभणीत मोठ्ठा ट्विस्ट! वंचितने उमेदवार बदलला; हवामान अभ्यासकच मैदानात

Parbhani Lok Sabha Constituency : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. राजकीय (Parbhani Lok Sabha Constituency) पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत तसेच उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या जात आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचित आघाडीने आतापर्यंत 19 उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांमध्ये काही ठिकाणी बदलही करण्यात आले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मोठा बदल केला आहे.

या मतदारसंघात बाबासाहेब उगले यांच्या जागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना (Punjabrao Dakh) उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित आघाडीने घेतलेला या निर्णयामुळे परभणी मतदार संघात मोठा ट्वेस्ट आला आहे. पंजाबराव डख यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी लगोलग आज उमेदवारी अर्जही दाखल केला. यामुळे आता परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी झाली आहे.

Osmanabad Lok Sabha : धाराशिवचा उमेदवार ठरला! भाजप आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीनं दिलं तिकीट..

Parbhani Lok Sabha

वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत तीन वेळा उमेदवारांमध्ये फेरबदल केल्याचे दिसून आले आहे. आघाडीने आतापर्यंत राज्यात 19 लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत यापैकी तीन उमेदवारांमध्ये बदल करण्यात आला आहे. रामटेक मतदारसंघात शंकर चहांदेंना उमेदवारी दिली होती परंतु त्यांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना आघाडीने पाठिंबा दिला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती नंतर त्यांच्या जागी अभिजीत राठोड यांना उमेदवारी देण्यात आली.

परभणी मतदारसंघातून महायुतीचे महादेव जानकर हे (Mahadev Jankar) निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडी संजय जाधव यांना संधी दिली आहे या दोघांमध्ये लढत होईल असे सुरुवातीला वाटत होते. परंतु वंचित बहुजन आघाडीनेही या ठिकाणी एन्ट्री घेतली त्यामुळे आता निवडणूक तिरंगी झाली आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडमध्ये पंकजांविरुद्ध ‘या’ उमेदवाराला तिकीट

Parbhani Lok Sabha

दरम्यान, आज (Sharad Pawar NCP Candidate List) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment