Pankaja Munde : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे.
करचुकवेगिरीप्रकरणी अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये कारखान्यावर छापा टाकला होता. तोट्यात वैद्यनाथ साखर कारखाना सध्या बंद आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातही जीएसटी विभागाने या कारखान्यावर छापा टाकला होता.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी जीएसटीने मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती. यातून कारखान्यात 19 कोटी रुपयांची अवैध जीएसटी करचोरी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर रविवारी औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
साखर कारखान्यावर 250 कोटींचे कर्ज
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी जप्त करण्यात आली आहे. जीएसटी विभागाने जप्त केलेल्या यंत्रांचा लिलाव करून कर वसूल करणार असल्याचे सांगितले आहे. या कारखान्याच्या चेअरमन दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आहेत.
पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार वैद्यनाथ साखर कारखाना वर्षानुवर्षे तोट्यात चालला होता. 2013 ते 2015 च्या दुष्काळामुळे साखर कारखान्यांच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आणि कोविड-19 महामारीने संकट आणखी वाढवले. कारखान्यावर 250 कोटींचे कर्ज आहे.