PAN Card: CBDT म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस देशातील सर्व करदात्यांना आधार कार्डशी त्यांचे पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक केले आहे.
जर तुम्ही 31 मार्च 2023 पूर्वी आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर 1 एप्रिल 2023 पासुन तुमचे पॅन कार्ड रद्द देखील होऊ शकते.
शेअर बाजार नियामक सेबी (SEBI) ने गुंतवणूकदारांना मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. तसे न केल्यास त्यांच्या बाजारातील व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
समस्या निर्माण होऊ शकतात
केंद्र सरकारने 1 जुलै 2017 पासून आधारशी पॅन लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची तारीख सरकारने अनेकवेळा वाढवली आहे. CBDT ने आता त्याची तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नाही, तर तुम्हाला आयकर भरणे, बँक व्यवहार करणे, शेअर्सची खरेदी-विक्री इत्यादीमध्ये अडचणी येऊ शकतात.
पॅनला आधारशी कसे लिंक करावे
तुम्ही तुमचा पॅन घरबसल्या आधारशी सहजपणे लिंक करू शकता. यासाठी अधिकृत आयकर ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in/iec/foportal/ ला भेट द्या आणि ‘क्विक लिंक्स’ विभागात ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा. पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यावर ते एकमेकांशी जोडले जातील.
SMS द्वारे आधारशी पॅन लिंक कसे करावे
SMS द्वारे आधारशी पॅन लिंक करण्यासाठी, तुम्हाला UIDPAN <12 अंकी आधार कार्ड> <10 अंकी पॅन> 567678 किंवा 56161 वर पाठवावे लागेल. याशिवाय, तुम्ही पॅन सेवा केंद्रावर जाऊन पॅन आणि आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता.