Pan Card Update : देशात आज प्रत्येक आर्थिक काम करण्यासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते.
यामुळे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही आतापर्यंत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
सरकारने महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये पॅन कार्डचा समावेश केला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ते आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
या कामासाठी सरकारने 31 मे पर्यंतची मुदत दिली आहे. आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 31 मे पर्यंतची मुदत दिली आहे. तुमचे काम वेळेवर झाले नाही तर भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही हे काम 31 मे पर्यंत पूर्ण केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे हे काम आजच उरकून घ्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे काम 31 मे पर्यंत पूर्ण न केल्यास तुमचे पॅनकार्ड निरुपयोगी होईल. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅन कार्ड न दिल्यास ती व्यक्ती तितकीच जबाबदार असेल.
अशा स्थितीत तुम्ही सर्व आर्थिक कामे करू शकणार नाही. ज्यांच्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन कार्ड लिंक न केल्यास, पुढील महिन्यापासून म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि बँक खाते उघडणे यासारखे महत्त्वाचे काम तुम्ही करू शकणार नाही.