PAN-Aadhaar Linking Deadline: नागरिकांनो, 31 मे पूर्वी ‘हे’ काम कराच, नाहीतर द्यावे लागणार दुप्पट शुल्क

PAN-Aadhaar Linking Deadline : एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आयकर विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

 या अधिसूचनेनुसार ज्या करदात्याचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल त्या करदात्याला दुप्पट टीडीएस भरावा लागेल. आधार कार्डशी पॅन कार्डला लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मे आहे.

तुम्ही अजून हे केले नसेल तर लगेच करा. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही येथून जाणून घेऊ शकता.

 हे काम 31 मे पूर्वी पूर्ण करा

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मे आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार पॅनकार्डधारक आणि करदात्यांनी 31 मे 2024 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करावे लागणार आहे. असे न केल्यास,  करदात्यांना त्या पॅनकार्डवर अतिरिक्त दराने टीडीएस भरावा लागेल.

याप्रमाणे पॅन आधार लिंक करा

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे खूप सोपे आहे. यासाठी या सोप्या स्टेप्सचे पालन करणे आवश्यक आहे:

1. सर्व प्रथम प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जा.

2. ‘क्विक लिंक्स’ च्या सेक्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला ‘लिंक आधार’ हा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

3. येथे तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकावा लागेल आणि नंतर व्हॅलिडेट पर्यायावर क्लिक करा.

4. आधार कार्डमध्ये नोंदवलेले तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाका आणि आधार लिंक वर क्लिक करा.

5. मोबाईल नंबर आणि त्यावर मिळालेला OTP येथे एंटर करा आणि नंतर ‘Validate’ बटणावर क्लिक करा.

Leave a Comment