दिल्ली : वाढती गुन्हेगारी आणि दहशतवादी घटना यामध्ये पाकिस्तान भारतापेक्षा कसा चांगला आहे आणि इथे सगळेच अलबेल असल्याच्या बातम्या भारतीय माध्यमातून येतात. काहीअंशी हे वास्तव असले तरी जगाच्या यादीत भारत आणि पाकिस्तान हे देश एकाच पातळीवर आहेत. उलट करोनाच्या परिस्थितीवर पाकिस्तानने चांगले काम केल्याची पावती अमेरिकेच्या प्रशासनाने दिली आहे. अमेरिकेने भारत व पाकिस्तानलाही ट्रॅव्हल अॅडव्हायझरी लेव्हल 3 मध्ये ठेवले आहे. त्याचवेळी पाकिस्तानला कोरोनाबाबत यूएस सीडीसीने लेव्हल 1 श्रेणीत ठेवले आहे.
भारतातील वाढता कोरोना, बलात्कार आणि जम्मू-काश्मीरमधील वाढता दहशतवाद लक्षात घेता अमेरिकेच्या जो बिडेन प्रशासनाने आपल्या नागरिकांना भारताच्या कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचा पुनर्विचार करण्याचा ‘संदेश’ दिला आहे. बिडेन प्रशासनाच्या वतीने असेही सांगण्यात आले आहे की, बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक बनला आहे. अमेरिकेने आपल्या प्रवास सल्लागार संदेशात म्हटले आहे की, ‘अमेरिकन नागरिकांनी दहशतवाद आणि नागरी अशांतता लक्षात घेता जम्मू आणि काश्मीर राज्यात (पूर्व लडाख प्रदेश आणि त्याची राजधानी लेह वगळता) प्रवास करू नये. भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किमी आत जाऊ नका कारण सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘तुम्ही FDA-मान्यता मिळालेल्या लसीने पूर्णपणे लसीकरण केले असल्यास, तुम्हाला कोविड-19 ची लागण होण्याचा आणि गंभीर लक्षणे दिसण्याचा धोका कमी होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादी हिंसाचार वाढत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या काही भागात धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, पाकिस्तानला कोरोनाबाबत यूएस सीडीसीने लेव्हल 1 श्रेणीत ठेवले आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवास न करण्यास सांगितले आहे. या भागात दहशतवाद आणि अपहरणाच्या घटना घडत आहेत.
‘त्या’ स्वप्नांना बसला मंगळ झटका..! पहा कशाचा स्वप्नभंग झालाय सगळ्यांचा https://t.co/VyTjdXuSRH
— Krushirang (@krushirang) January 26, 2022