Pakistan : सध्या अनेक संकटांच्या फेऱ्यात अडकलेल्या पाकिस्तानने अखेर भारताबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरचे कारण सांगत भारताबरोबर व्यापार बंद करणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा व्यापार सुरू करणे भाग पडले आहे. देशात सध्या मोठा पूर आला आहे. या संकटाचा देशातील कोट्यावधी लोकांना फटका बसला आहे. महागाई तर नियंत्रणाबाहेर गेली आहे. किंबहुना, लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या (Vegetable) आणि फळांच्या (Fruit) किमतीत मोठी वाढ झाली आहे. हे पाहता पाकिस्तान (Pakistan) सरकार भारतातून (India) टोमॅटो आणि कांद्याची आयात करणार आहे.
पाकिस्तानी मीडियाने सोमवारी अर्थमंत्र्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की पाकिस्तान भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करेल. अहवालात म्हटले आहे की पाकिस्तान भारतासोबत व्यापार (Trade) पुन्हा सुरू करेल. पाकिस्तानचे अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली. लाहोर मार्केटमधील घाऊक विक्रेत्यांनी पीटीआयला सांगितले की, “रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा भाव अनुक्रमे 500 आणि 400 रुपये किलो होता. मात्र, रविवारच्या बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या नेहमीच्या बाजारापेक्षा 100 रुपये किलोने कमी दराने उपलब्ध होत्या.
सिंध आणि दक्षिण पंजाबमधील भाज्यांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असल्याने आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढतील. येत्या काही दिवसांत कांदा (Onion) आणि टोमॅटोचा (Tomato) भाव किलोमागे 700 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. तसेच बटाट्याचा भाव 40 रुपये किलोवरून 120 रुपये किलो झाला आहे. वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याचे कळते. सध्या अफगाणिस्तानमधून (Afghanistan) लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून टोमॅटो आणि कांद्याचा पुरवठा केला जात आहे. लाहोर बाजार समितीचे सचिवांनी सांगितले की, बाजारात सिमला मिरचीसारख्या भाज्यांचीही कमतरता निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते. ते तुलनेने सोपे ठरणार आहे.