नवी दिल्ली : पाकिस्तान मध्येही कोरोनाचे संकट वेगाने वाढत आहे. येथे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देश आधीच संकटात आहे त्यात आता कोरोना थैमान घालू लागल्याने परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून काही कठोर निर्णय घेणे सरकारला भाग पडले आहे. या संकटाला घाबरुन सरकारने आता देशातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी शाळा बंद करणार नाही, असे सरकारने म्हटले होते.
देशभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोनाा वाढता वेग पाहता NCOC ने शुक्रवारी देशभरातील सर्व शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, जेथे कोविड-19 संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक नोंदले गेले आहे. शैक्षणिक संस्था, कॅम्पस, सर्वाधिक सकारात्मकता असलेले विशिष्ट विभाग आठवडाभर बंद राहतील, असे NCOC ने एका अधिसूचनेत म्हटले आहे.
नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने (NCOC) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 94 रूग्णांची प्रकृती अधिकच बिघडली आहे. एका दिवसाआधीच्या 961 वरून गंभीर रूग्णांची संख्या 1,055 वर पोहोचली आहे. अर्थात, ही संख्या भयावह आहे. यामुळे देशातील पॉजिटिविटी प्रमाण 11.10 टक्क्यांवर पोहोचले आहे, जे एका दिवसापूर्वी 12.93 टक्के होते. NCOC डेटा दर्शवितो, की गेल्या 24 तासांत 58,902 चाचण्या घेतल्या गेल्यानंतर देशभरात 6,540 संसर्गाची नोंद झाली आहे.
दरम्यान, देशातील कोरोना पॉजिटिव दरात वेगाने वाढ होत असल्याची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली आहे. पण आम्ही पाकिस्तानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करणार नाही हा आमचा संकल्प आहे. आपली अर्थव्यवस्था दुसर्या लॉकडाऊनचा भार सहन करू शकत नाही. चौधरी यांनी भर दिला की देश कोरोना व्हायरसचा सामना करू शकतो आणि सरकार लॉकडाऊन करणार नाही. तथापि, परिस्थितीवर लक्ष ठेवणे सुरू राहील, असे पाकिस्तान सरकारमधील मंत्री चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
सध्या जगभरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. अमेरिकेतील कोरोना प्रकरणांनी पुन्हा एकदा आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. देशात साथीच्या आजारानंतर दुसऱ्यांदा एका दिवसात 10 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत, ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सोमवारी अमेरिकेत 10.13 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी अमेरिकेत प्रथमच 10 लाख प्रकरणे समोर आली होती.
… अन् तरीही पाकिस्तान मध्ये ना शाळा बंद.. ना लॉकडाऊन; सरकारने दिलाय स्पष्ट नकार