Pakistan Rain : पाकिस्तानात हाहाकार! 37 लोकांचा मृत्यू, रस्ते खचले, घरे कोसळली; पहा, नेमकं काय घडलं?

Pakistan Rain : मागील आठवड्यात पाकिस्तानात मुसळधार पाऊस (Pakistan Rain) झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती (Pakistan Rain) निर्माण झाली आहे. या पावसामुळे सुमारे 37 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. पावसामुळे नागरिकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या (Heavy Rain in Pakistan) असून त्यामुळे रस्ते खचले आहेत. उत्तर पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतातील परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. पाकिस्तानात कालच शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर हे पहिलेच मोठे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

Pakistan Rain

पाकिस्तानच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे म्हणणे आहे की 29 फेब्रुवारीपासून खैबर पख्तूनख्वा प्रांतात पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश लहान मुले आहेत. मागील 48 तासांत खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर, स्वात, लोअर दीर, मलाकंद, खैबर, पेशावर, उत्तर वझिरिस्तान आणि लक्की मारवत या दहा जिल्ह्यांत 37 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

Pakistan Elections 2024 : पाकिस्तानसमोर नवं संकट! अमरिकेतील खासदारांच्या ‘या’ मागणीने वाढलं टेन्शन

Pakistan Rain

दक्षिण पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या शहरात आलेल्या पुरामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. या पुरात काही नागरिक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. ग्वादर शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. पाणी घरात शिरल्याने काही ठिकाणी घरेही पडली आहेत. रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला चीनशी जोडणारा महामार्ग जमीन खचल्याने बंद झाला आहे. खराब हवामानामुळे अधिकाऱ्यांनी पर्यटकांना उत्तर पाकिस्तानच्या दिशेने न येण्याचे आवाहन केले आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे या भागात अनेक पर्यटक अडकून पडले होते. Pakistan Rain

Pakistan Financial Crisis : कंगाल पाकिस्तानला दिलासा! ‘या’ देशाने केली मोठ्ठी मदत, जाणून घ्या..

Leave a Comment