Pakistan Presidential Election : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन (Pakistan Presidential Election) महिनाभरानंतर शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. या निडणुकीसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली. पाकिस्तान पीपुल्स पार्टी आणि पीएमएलएन पक्षाचे संयुक्त नेते असिफ जरदारी (Asif Jardari) राष्ट्रपती पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. जरदारी हेच पाकिस्तानचे राष्ट्रपती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जर असे घडले तर जरदारी दुसऱ्यांदा राष्ट्रपती होतील. जरदारी यांच्या विरोधात महमूद खान अचकजई निवडणुकीच्या रिंगणात आहेत
असिफ जरदारी राष्ट्रपती हेच राष्ट्रपती होतील हे निश्चित आहे. सध्याचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांचा कार्यकाळ मागील वर्षात संपुष्टात आला आहे. परंतु, नवीन राष्ट्रपती नियुक्त होईपर्यंत ते या पदावर कायम आहेत. सध्याचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असिफ जरदारी हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो जरदारी यांचे पती आहेत. पीपीपी आणि पीएमएल-एन यांच्यात ठरल्यानुसार शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली त्यानतंर आता पीपीपीला राष्ट्रपतीपद मिळणार आहे.
Sweden Joins NATO : रशियाला धक्का! ‘नाटो’ संघटनेत आणखी एका देशाची एन्ट्री; अमेरिकेचा प्लॅन यशस्वी
Pakistan Presidential Election
या दोन्ही पक्षांतील करारानुसार पीएमएल-एन पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांची पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. तर सिंध प्रांतात पीपीपी पक्षाला सत्ता मिळाली आहे. जरदारी 2008 ते 2013 या काळात राष्ट्रपती होते आता ते पुन्हा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहेत. या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. याचे मोठे कारण म्हणजे पंजाब, सिंध, बलुचिस्तान विधानसभेत पीपीपी आणि पीएमएल-एन यांचे बहुमत आहे. विरोधी पक्षांकडे फक्त खैबर पख्तूनख्वा प्रांतात बहुमत आहे.
पाकिस्तान राष्ट्रपती पदाची निवडणूक इलेक्टोरल कॉलेज प्रक्रियेनुसार होईल. यामध्ये संघ आणि प्रांतीय असेंब्लीचे सदस्य मतदान करतील. असिफ जरदारी यांचे प्रतिस्पर्धी अचकजई हे पख्तूनख्वा मिल्ली अवामी पार्टीचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इंसाफने पाठिंबा दिलेले उमेदवारही रिंगणात आहेत. याआधी अचकजई यांन इलेक्टोरल कॉलेज पूर्ण होईपर्यंत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु, आयोगाने त्यांची मागणी मान्य केली नाही. इलेक्टोरल कॉलेज पूर्ण न करता या निवडणुका घेणे विरोधक बेकायदेशीर मानत आहेत.
Pakistan Presidential Election
पाकिस्तानच्या संसदेत 325 सदस्य आहेत. तसेच 91 सिनेटर आहेत. पंजाब विधानसभेत 354, सिंध विधानसभेत 157, खैबर पख्तूनख्वामध्ये 117 आणि बलुचिस्तान विधानसभेत 65 सदस्य आहेत. यानंतर आता मतमोजण होऊन कोण राष्ट्रपती होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
India Maldives Relation : मालदीवचा भारताला झटका! चीनची साथ मिळताच घेतला ‘हा’ मोठा निर्णय