Pakistan Presidential Election 2024 : पाकिस्तानात आता राष्ट्रपती निवडणूक; पहा, काय होतंय ‘पॉलिटिक्स’?

Pakistan Presidential Election 2024 : पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुका होऊन महिना होत आला तरीही नवीन (Pakistan Presidential Election 2024) सरकार अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे देशाचा पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न वीस महिना होत आला तरी कायम आहे. यानंतर आता आणखी एक निवडणूक देशात होणार आहे. राष्ट्रपती पदासाठीची ही निवडणूक आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने शुक्रवारी घोषणा केली की राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान 9 मार्च रोजी होणार आहे. आगामी निवडणुकीत पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ जरदारी तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) नोटीसमध्ये म्हटले आहे की, नॅशनल असेंब्ली आणि सर्व प्रांतीय विधानसभांमध्ये 9 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित पदासाठीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत मुदत होती. उमेदवारांनी लाहोर, कराची, पेशावर आणि क्वेटा येथील निवडणूक अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. उमेदवारी अर्जांची छानणी 4 मार्च रोजी अधिकाऱ्यांद्वारे केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी अर्ज मागे घेता येतील, असे आयोगाने सांगितले.

Pakistan Elections 2024 : पाकिस्तानसमोर नवं संकट! अमरिकेतील खासदारांच्या ‘या’ मागणीने वाढलं टेन्शन

Pakistan Presidential Election 2024

पीएमएल-एन पक्षाचे नेते शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या नेतृत्वाखालील सहा पक्षांच्या आघाडीने माजी राष्ट्रपती आसिफ जरदारी यांना सर्वोच्च पदासाठी नामांकन दिले आहे. यामुळे जरदारी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. युतीमध्ये पीएमएल-एन), पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान (MQM-P) आणि इतर पक्षांचा समावेश आहे.

पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्रपती आरिफ अल्वी यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपत आहे. त्यांच्या निवृत्तीपूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवीन राष्ट्रपतींची निवडणूक होणार होती मात्र सार्वत्रिक निवडणुकांना उशीर झाल्यामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?

Pakistan Presidential Election 2024

पाकिस्तानच्या निवडणुकीत घोटाळा 

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा (Imran Khan) पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत अनेक ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपही सोशल मीडियामध्ये प्रसारित केल्या जात आहेत. आता देशात स्थापन होणाऱ्या आघाडी सरकारचे पंतप्रधान पीएमएल-एनचे शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) असतील, तर राष्ट्रपती पीपीपी पक्षाचे आसिफ जरदारी असतील, असे सांगण्यात येत आहे.

इम्रान खान समर्थकांच्या निदर्शनांदरम्यान पीएमएल-एन नेते सरदार अयाज सादिक यांची शुक्रवारी पाकिस्तान संसदेच्या स्पीकरपदी निवड करण्यात आली. सादिक यांना एकूण 291 मतांपैकी 199 मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अमीर डोगर यांना केवळ 91 मते मिळाली. दरम्यान पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. 9 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पीएमएल-एनचे घोषित उमेदवार आसिफ जरदारी या शर्यतीत आघाडीवर आहेत. दुसरीकडे, गौहर खान यांची पीटीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे पीटीआय समर्थित उमेदवार यांची खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांना 106 सदस्यीय प्रांतीय विधानसभेत 90 मते मिळाली तर पीएमएल-एनचे उमेदवार यांना पीपीपी आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने केवळ 16 मते मिळाली. Pakistan Presidential Election 2024

Leave a Comment