दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना देशात गृहयुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शाहबाज यांनी रविवारी इम्रानचे एबटाबादमधील भाषण हे पाकिस्तानविरुद्धचे (Pakistan) षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. शाहबाज म्हणाले, की “पाकिस्तानचे 22 कोटी नागरिक एक व्यक्ती आणि राष्ट्रीय संस्थांचे गुलाम नाही. इम्रान खान खूप खोटे सांगत आहेत. पण, आता त्यांना सत्याचा सामना करावा लागणार आहे.
शाहबाज म्हणाले, की आज पाकिस्तानची परिस्थिती, संविधान आणि राष्ट्रीय संस्थांना आव्हान देण्यात आले आहे, त्यामुळे पीटीआय अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. शाहबाज पुढे म्हणाले की, इम्रान खान (Imran Khan) राजकारणात षडयंत्र रचत नाहीत, तर ते पाकिस्तानविरोधात कट रचत आहेत. “एका व्यक्तीच्या अहंकार आणि खोटेपणाच्या आधारावर पाकिस्तानचा बळी दिला जाऊ शकत नाही. आधी इम्रान खानने पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आणण्याचा कट रचला आणि आता ते गृहयुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे ते म्हणाले.
याआधी इम्रान खान यांनी एबटाबाद येथील रॅलीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. इम्रान खान यांनी दावा केला की, “शरीफ कुटुंबाने जे खोटे सांगितले आहे, मी याआधी असे खोटे कोणीही पसरवताना पाहिले नाही. बघा, आयात केलेले सरकार सत्तेवर आल्यावर सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या. चोरी केलेले पैसे परदेशात पाठवल्यानंतर पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याचे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये गंभीर आर्थिक संकट आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील नवीन सरकारला दिलासा देत, IMF ने रखडलेले बेलआउट पॅकेज एक वर्षाने वाढ करण्यास आणि कर्जाची रक्कम $8 अब्ज पर्यंत वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानचे (Pakistan) नवे अर्थमंत्री आणि IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा करार केला आहे. आयएमएफने मान्य केले आहे, की हा कार्यक्रम सप्टेंबर 2022 अखेरपासून आणखी नऊ महिने ते एक वर्ष वाढ केला जाईल, तर कर्जाचा (Loan) आकार सध्याच्या $6 बिलियन वरून $8 अब्ज पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.
भारतानंतर पाकिस्ताननेही दिला WHO ला धक्का; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण
पाकिस्तानसमोर विदेशी कर्जाचे मोठे संकट; नव्या सरकारने मात्र दिलेय ‘अजब’ उत्तर.. जाणून घ्या..