Pakistan News : आधी राष्ट्रपती आता पंतप्रधान! पाकिस्तान सरकारच्या ‘या’ निर्णयाची जगभरात चर्चा

Shehbaz Sharif and his Cabinet will not take Salary : पाकिस्तानात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा नव्या सरकारलाही सामना करावा लागत (Pakistan News) आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यानंतर आता पंतप्रधान शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी देशाचे आर्थिक स्थिती पाहता पगार न घेण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार सरकारने अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाच्या काटकसरीच्या धोरणानुसार वेतन व त्यासंबंधीचे सर्व लाभ माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Pakistan News : पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना पगारच नको; उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सरकारी निधीच्या वापराबाबत शहाबाज शरीफ यांच्या सरकारचा निर्णय उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहाबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळांनेही सरकारच्या निधीतून होणाऱ्या परदेश दौऱ्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सरकारने केंद्रीय मंत्री खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांना परदेश दौऱ्यावर न जाण्याचे आदेश दिले आहेत. तथापि सहलीसाठी सरकारी निधी वापरणे आवश्यक असल्यास शहाबाज शरीफ यांच्या सरकारकडून पूर्व परवानगी घ्यावी लागेल. गेल्या आठवड्यात राष्ट्रपती असिफ जरदारी आणि पाकिस्तान सरकारमधील गृहमंत्र्यांनी पगार न घेण्याची घोषणा केली होती.

Pakistan News

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी (Imran Khan) सांगितले की त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत कमकुवत करण्याच्या गटाचा एक भाग म्हणून एका आठवड्यात तीन प्रकरणांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना टार्गेट करण्याचा विरोधकांचा डाव फसला असे इमरान खान म्हणाले. येत्या पाच ते सहा महिन्यांत तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण होईल आणि त्यानंतर आताचे सरकारही पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानबाबत खान म्हणाले, इतर देशांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. इमरान खान यांच्या म्हणण्यानुसार फक्त परदेशी पाकिस्तानी नागरिकच आम्हाला मदत करू शकतात.

Pakistan Presidential Election : पाकिस्तानचा राष्ट्रपती कोण? आज मतदान; ‘या’ दोन उमेदवारांत टक्कर

Leave a Comment