Pakistan News : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीपीपी पक्षाचे नेते असिफ जरदारी (Pakistan News) विजयी झाले. त्यानंतर राष्ट्रपतीपदाची शपथही घेतली. यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. देशाची आर्थिक परिस्थिती पाहता जरदारी त्यांच्या कार्यकाळात कोणताही पगार घेणार नाहीत. राष्ट्रपती सचिवालयाच्या प्रेस विभागाने सांगितले की राष्ट्रपतींनी देशाच्या तिजोरीवर आधिक भार न टाकण्याचा निर्णय घेतला. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात पगार घेणार नसल्याचा निर्णय घेतला.
माजी राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांना त्यांच्या कार्यकाळात दर महिन्याला 8 लाख 46 हजार 550 रुपये पगार मिळत होता. हा पगार 2018 मध्ये पाकिस्तानी संसदेने निश्चित केला होता. त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती जरदारी यांनी मात्र पगार घेण्यास नकार दिला आहे. जरदारी हे पाकिस्तानमधील श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत.
Pakistan : सुरुवातीलाच संकट! विरोधक करणार देशव्यापी आंदोलन; पाकिस्तानात चाललंय काय?
Pakistan News
जरदारी यांच्याप्रमाणेच गृहमंत्र्यांनीही पगार घेणार नाही असे जाहीर केले आहे. सध्याच्या संकटाच्या काळात देशाची सेवा करणे जास्त महत्वाचे आहे. सध्या देश आर्थिक संकटात आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे गृहमंत्री नक्वी यांनी सांगितले. याआधी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनीही देशासमोरील आर्थिक संकटाचा मुद्दा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. देशातील नव्या सरकारसमोर वाढती महागाई आणि अन्न धान्याच्या किंमती नियंत्रित करण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे शरीफ या बैठकीत म्हणाले होते.
पाकिस्तानच्या संसदेत 325 सदस्य आहेत. तसेच 91 सिनेटर आहेत. पंजाब विधानसभेत 354, सिंध विधानसभेत 157, खैबर पख्तूनख्वामध्ये 117 आणि बलुचिस्तान विधानसभेत 65 सदस्य आहेत.
Pakistan News
पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजने पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, रोखीच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यामुळे गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 3 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते, ज्याची मुदतही मार्चमध्ये संपत आहे. पाकिस्तानचे क्रेडिट रेटिंग कमी करताना मुडीजने म्हटले होते की, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे देशातील परिस्थिती अशी झाली आहे की नवीन सरकारसाठी खूप आव्हानात्मक असेल.
Pakistan Rain : पाकिस्तानात हाहाकार! 37 लोकांचा मृत्यू, रस्ते खचले, घरे कोसळली; पहा, नेमकं काय घडलं?