Pakistan News : पाकिस्तानात मोठी घडामोड! पंतप्रधान पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव फायनल

Pakistan News : पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होऊन (Pakistan News) पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही नवीन सरकार अस्तित्वात आलेले नाही. पाकिस्तानातील निवडणुकीत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर दुसरीकडे मागील दहा दिवसांपासून देशातील सोशल मीडियावरही निर्बंध आणले गेले आहेत. या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएमएल-एन पक्षाने पंतप्रधान पदासाठी शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या नावाची घोषणा केली. पाकिस्तान राष्ट्रीय संसदेच्या अध्यक्षपदासाठीही नावाची घोषणा करण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर उद्या (गुरुवार) नव्या संसदेची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Pakistan News : मोठी बातमी! माजी पंतप्रधानाची मुलगी पहिली महिला CM; पाकिस्तानात काय घडतंय?

Pakistan News

पाकिस्तानच्या निवडणुकीत मोठा घोटाळा

निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना विजयी आणि विजयी झालेल्या उमेदवारांना पराभूत करण्यात आल्याचा दावा लियाकत चठ्ठा यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तर काही विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या या कारभाराविरोधात निदर्शनेही केली. इतकेच नाही तर काही ठिकाणची मतमोजणीही रद्द करावी लागली तर काही जिंकलेल्या उमेदवारांनी स्वतःहून माघार घेतली.

Pakistan News

या सगळ्या गोंधळात पाकिस्तानची निवडणूक अडकली आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांत सत्तावाटपाचे गणित जुळलेले नाही. त्यामुळे देशाचा पंतप्रधान कोण होणार, सरकार कधी अस्तित्वात येणार हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ पुढील पंतप्रधान असतील असे सांगण्यात येत आहे.

Pakistan News : सरकारचा नाही पत्ता पण, ‘उधारी’चा प्लॅन पक्का; पहा, काय घडतंय शेजारी

दरम्यान, निवडणुकीतील फसवणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. 29 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या नॅशनल अॅसेंब्लीच्या अधिवेशनात फक्त 133 सदस्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होऊ शकते. सर्वात मोठा पक्ष म्हणून पीएमएल-एन सरकार स्थापनेच्या दाव्यासह आघाडीवर आहे. या निवडणुकीत पीएमएल-एनने 75 जागा जिंकल्या आहेत. काही अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. 54 जागा जिंकणारा पीपीपी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 17 सदस्यांसह एमक्यूएमचाही पाठिंबा आहे. असे संख्याबळ असताना शाहबाज शरीफ यांना बहुमत सिद्ध करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे. (Pakistan News)

Leave a Comment