Pakistan News : पाकिस्तानसमोरील आर्थिक संकटे कमी होण्याचे नाव घेत (Pakistan News) नाहीत. निवडणुका होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही नव्या सरकारचा पत्ता नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) पु्न्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होतील असे सांगितले जात आहे. देशात कोणतेही सरकार आले तरी त्यांना अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ताबडतोब नवीन कर्ज घ्यावे लागेल अशी परिस्थिती निर्माण (Pakistan Economy) झाली आहे. ब्लूमबर्ग न्यूजने पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या हवाल्याने माहिती दिली आहे की सरकार चालविण्यासाठी पाकिस्तान आयएमएफकडून आणखी सहा अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याची योजना आखत आहे. या कर्जामुळे अब्जावधींच्या थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि देशात नवीन सरकार स्थापन होण्यात मदत मिळणार आहे. (Pakistan News)
अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तान आयएमएफबरोबर विस्तारीत निधी सुविधेसाठी वाटाघाटी करेल. या कर्जासाठी आयएमएफबरोबर मार्च किंवा एप्रिलमध्ये चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था स्थिर राखण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर चर्चा करावी लागेल असे सांगण्यात येत आहे. वास्तविक पाकिस्तान नवीन कर्ज घेऊन जुने कर्ज परत करण्याचा प्रयत्न करत आहे.
Pakistan Financial Crisis : कर्ज संपलंं, आता फक्त 30 दिवस; पाकिस्तानसमोर कोणतं संकट?
Pakistan News
पाकिस्तानने मागील वर्षातही नाणेनिधीकडून कर्ज घेतले होते. परंतु, हे कर्ज देताना संघटनेने अनेक अटी लादल्या होत्या. पाकिस्तानला आपल्या बजेटमध्ये सुधारणा करून वीज आणि नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करावी लागली.
Pakistan News
आयएमएफ व्यतिरिक्त पाकिस्तान चीनकडूनही कर्ज घेत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जिथून कर्ज मिळेल तिथून कर्ज घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. पाकिस्तान सरकारने मध्यंतरी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला होता. मात्र महसूल मिळवण्याच्या उद्देशाने दरवाढ करण्यात आल्याचे उत्तर त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी दिले होते.
Pakistan Elections : पाकिस्तानचा पंतप्रधान कोण? ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब
दरम्यान, सन 2011 पासून पाकिस्तानवरील कर्द दुपटीने वाढले आहे. मागील वर्षात आयएमएफने तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. या कर्जाची मुदत लवकरच संपणार आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार मूडीजने केलेले देशातील परिस्थितीचे आकलन नव्या सरकारसाठी डोकेदुखी ठरणारे आहे. पाकिस्तानात कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी अस्थिरता कायम राहणार असल्याचे मूडीजचे निरीक्षण आहे. 2024 मध्ये पाकिस्तानला जवळपास 49.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करायचे आहे. या कर्जावरील व्याजाची रक्कमच जवळपास 30 टक्के आहे.
पाकिस्तानचे चलनही घसरले आहे. पाकिस्तानचा एक रुपया भारताच्या 30 पैशांच्या बरोबरीचा आहे. तर एक अमेरिकन डॉलर 277 पाकिस्तानी रुपयांबरोबर आहे. या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. (Pakistan News)