Pakistan : बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरीबी, वाढती महागाई, दहतवाद अशा असंख्य संकटांनी घेरलेल्या पाकिस्तानात (Pakistan) नवाच राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या काळजीवाहू सरकारने इम्रान खानच्या (Imran Khan) पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या निषेध आणि रॅलींदरम्यान दहशतवादी धमक्यांचा हवाला देत लाहोरमध्ये सात दिवसांसाठी कलम 144 लागू केले आहे. काळजीवाहू सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लाहोरमधील तीन भागात पुढील सात दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
कलम 144 नुसार सर्व प्रकारच्या रस्त्यावरील सभा, जलसे, सार्वजनिक सभा आणि मेळावे घेण्यास मनाई आहे. उपायुक्त लाहोर यांनी काळजीवाहू पंजाब सरकारला कलम लागू करण्यासाठी पत्र लिहिल्यानंतर हा निर्णय झाला, असे एआरवाय न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे, पीटीआय प्रमुख इम्रान खान यांनी टेलिव्हिजनवर लोकांना संबोधित करताना जेल भरो कार्यक्रमाची घोषणा केली होती.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
माहितीनुसार 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पीटीआयचे 200 कार्यकर्ते आणि एमएनएचे सहा सदस्य गट दररोज अटक होणार आहेत. कार्यकर्त्यांना व सदस्यांना अटक न झाल्यास ते त्याच जागेवर बसणार आहेत. पेशावरचे कार्यकर्ते 23 फेब्रुवारीला पेशावर, 24 फेब्रुवारीला रावळपिंडीचे कार्यकर्ते, 2 फेब्रुवारीला मुलतान आणि गुजरांवाला येथील कार्यकर्ते स्वतःला अटक करून घेतील.
याआधी खान म्हणाले होते की, आम्ही सर्व तुरुंग भरू आणि शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) सरकारच्या अधिकाऱ्यांना लपायला जागा राहणार नाही. सध्याच्या युती सरकारला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या आणि मित्रपक्षांना दोष देत, खान यांनी दावा केला की पोलिस मुलतानमधील पीटीआय कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना धमकावत होते.