Pakistan Inflation | बाब्बो..! दूध 210 रुपये लिटर; भारताच्या शेजारी देशात महागाईचं थैमान

Pakistan Inflation : पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दैनंदीन (Pakistan Inflation) गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठीही येथील नागरिकांना खूप पैसे खर्च करण्याची वेळ आली आहे. इंधनाचे दर तर वाढले आहेतच त्याचबरोबर आता खाण्यापिण्याच्या वस्तू्ंनीही त्रास देण्यास सुरुवात केली आहे. आजमितीस पाकिस्तानात एक लिटर दुधासाठी तब्बल 210 रुपये मोजावे लागत आहेत. दुधासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूही लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत आणि याला कारणीभूत आहे त्यांची प्रचंड महागाई.

खराब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असलेल्या पाकिस्तानमधील कराचीमध्ये (Karachi) शहराच्या आयुक्तांनी डेअरी फार्मर्स असोसिएशनच्या मागण्या (Inflation in Pakistan) मान्य करून दुधाच्या दरात लिटरमागे 10 रुपयांनी वाढ केली आहे. कराचीतील दुकाने आता 210 रुपये प्रति लिटर या दराने दूध विकत आहेत. एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार ही माहिती मिळाली आहे.

Pakistan : खर्च कमी करण्याची भन्नाट आयडिया; पाकिस्तान सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Pakistan Inflation

कराची आयुक्तांच्या सूचनेनुसार दुधाच्या दरात प्रति लीटर 10 रुपयांनी (Milk Price) वाढ झाली आहे परंतु यापूर्वी दुधाच्या दरात 50 रुपये प्रति लिटरने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. कराचीतील महागाईमुळे नागरिकांना दूध 50 रुपयांनी प्रतिलिटर महागण्याची भीती होती.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, कराचीतील डेअरी फार्मर्सचे अध्यक्ष मुबाशेर कादिर अब्बासी यांनी संकेत दिले आहेत की कराचीच्या लोकांसाठी लवकरच दुधात प्रति लिटर 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. अब्बासी यांचे म्हणणे आहे की, दूध उत्पादनाचा वाढता खर्च, जनावरांच्या वाढत्या किमती आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे दुधाच्या दरात अचानक वाढ दिसून येते. उत्पादन खर्चानुसार दुधाच्या नवीन दराबाबत कराची आयुक्तांनी तातडीने अधिसूचना जारी करण्याची नितांत गरज आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी 10 मे पर्यंत दुधाचे दर वाढवण्याची घोषणा केली नाही तर, भागधारक आपसी सहमतीनंतर किमती वाढवतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. 2 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील महागाईचा दर एक टक्क्याने खाली आल्याचे दिसून आले आहे.

Pakistan Election | पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खानला धक्का; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा मोठा विजय

Leave a Comment