Pakistan : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान (Pakistan) म्हणून शाहबाज शरीफ यांनी नुकतीच शपथ (Shehbaz Sharif) घेतली. यानंतर पंतप्रधान म्हणून कामकाज सुरू केल्यानंतर त्यांना सुरुवातीलाच विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाने येत्या 10 मार्च (रविवार) रोजी देशव्यापी आंदोलानाची घोषणा केली आहे. निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा (Pakistan Elections) आरोप पक्षाकडून सातत्याने केला जात आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते असद कैसर यांनी सांगितले की आम्ही सर्व राजकीय शक्तींना एकत्र करू आणि मोठी चळवळ उभी करू. देशातील सर्व प्रांतात आंदोलनाची तयारी केली जात आहे. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. पीटीआय समर्थित 90 उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला. माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पीएमएल-एन पक्षाला 75 जागा मिळाल्या तर बिलावल भुट्टो यांच्या (Bilawal Bhutto) पीपीपी पक्षाने 54 जागा जिंकल्या. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पक्षाने 17 जागा जिंकल्या आहेत.
Pakistan Rain : पाकिस्तानात हाहाकार! 37 लोकांचा मृत्यू, रस्ते खचले, घरे कोसळली; पहा, नेमकं काय घडलं?
यानंतर सरकार स्थापन करण्यास महिनाभराचा वेळ लागला. या निवडणुकीत फसवणूक झाल्याचे आरोप होऊ लागली. याची चौकशी करण्यासाठी समितीही गठीत करण्यात आली. त्यामुळे नवीन सरकार येण्यास वेळ लागला. आता नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पीएमएल-एन आणि पीपीपी पक्षांत सरकार स्थापन करण्यासाठी जागावाटपावर सहमती बनली होती.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या (Imran Khan) पक्षाने मात्र या सरकारला तीव्र विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी जनादेशाची चोरी केल्याचा आरोप करत देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. देशभरात आंदोलनाची तयारी पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार असल्याची माहिती कैसर यांनी दिली.