Pakistan : रोखीच्या तीव्र टंचाईचा सामना करत असलेल्या पाकिस्तान (Pakistan) सरकारने निवडक लक्झरी वस्तूंवरील विक्री कर 17 टक्क्यांवरून 25 टक्के केला आहे. फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (FBR) ने बुधवारी कर वाढ करण्याचे आदेश जारी केल्याचे वृत्त द न्यूज इंटरनॅशनल या वृत्तपत्राने दिले आहे. तर डॉन वृत्तपत्राने वृत्त दिले आहे, की कर वाढीमुळे मोबाईल फोन, आयात केलेले खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू आणि इतर लक्झरी वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.
तीन श्रेणीतील वस्तूंवरही जीएसटी
स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या वस्तूंच्या तीन श्रेणींवरही जीएसटी (GST) आकारण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित SUV आणि CUV, स्थानिक पातळीवर उत्पादित 1,400 cc आणि त्याहून अधिक इंजिन क्षमता असलेली वाहने आणि स्थानिक पातळीवर उत्पादित डबल केबिन (434) पिकअप वाहनांसहीत स्थानिक पातळीवर उत्पादीत केलेल्या वस्तूंवर 25 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अटींची पूर्तता करण्यासाठी पाकिस्तानने यापूर्वी इंधन दरात वाढ, निर्यात आणि ऊर्जा क्षेत्रातील सबसिडी मागे घेण्यासह अनेक पावले उचलली होती. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत IMF शिष्टमंडळासोबत 10 दिवसांच्या चर्चेनंतर तसेच आता व्हर्च्युअल चर्चा सुरू आहेत, परंतु IMF मदतीवर कोणतेही एकमत झालेले नाही.
दरम्यान, पाकिस्तानचे अर्थमंत्री या आठवड्यात आयएमएफसोबत बेलआउट करारावर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा आहे. सरकार आयएमएफसह USD 7 अब्ज बेलआउट पूर्ण करण्यासाठी “पूर्णपणे वचनबद्ध” आहे. या आठवड्यात IMF सोबत करार केला जाऊ शकतो असे पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले.