Pakistan Financial Crisis : कर्ज संपलंं, आता फक्त 30 दिवस; पाकिस्तानसमोर कोणतं संकट?

Pakistan Financial Crisis : पाकिस्तानात (Pakistan Financial Crisis) नुकत्याच निवडणुका झाल्या (Pakistan Election) आहेत. निकालही आले आहेत. मात्र या निकालात फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे येथील राजकारण तापलं आहे. त्यामुळेच मतमोजणी होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही येथे सरकारचा अजूनही पत्ता नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात आहे. शाहबाज शरीफ पुन्हा पंतप्रधान होतील अशी शक्यता आहे. या घडामोडीतच टेन्शन देणारी आणखी एक बातमी आली आहे.

जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने पाकिस्तानचे (Pakistan News) क्रेडिट रेटिंह कमी केले आहे. मूडीजच्या अहवालात म्हटले आहे की पाकिस्तानात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटामुळे देशाला गंभीर आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. मूडीजने दावा केला आहे की राजकीय अनिश्चिततेमुळे पाकिस्तानातील नवीन सरकारला नवीन कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संपर्क साधणे कठीण होईल. याचे महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानवर आधीच 49.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे.

Pakistan Financial Crisis

आयएमएफने मागील वर्षातील जून महिन्यात पाकिस्तानला तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. या कर्जाचा कालावधी नऊ महिन्यांचा आहे. ही मुदत संपण्यासाठी आता फक्त चार महिनेच शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला आणखी मोठ्या कर्जाची गरज भासत आहे. मूडीजने पाकिस्तानला धोक्याचा इशारा दिला असून एप्रिलपर्यंत पाकिस्तानाच्या तिजोरीत खडखडाट होण्याची शक्यता आहे. या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

Pakistan Financial Crisis

मूडीजने पाकिस्तानचे क्रेडिट रेटिंगही कमी केले आहे. मूडीजचा हा झटका पाकिस्तानचा अडचणीचा ठरणारा आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था आयएमएफच्या कर्जावरच चालत आहे. पाकिस्तानला मागील वर्षात आयएमएफने कर्ज दिले होते. परंतु, नवीन वर्ष सुरू होऊन दोन महिनेही झाले नाहीत की नव्या कर्जाची गरज भासू लागली आहे.

Pakistan Financial Crisis

पाकिस्तानचे चलनही घसरले आहे. पाकिस्तानचा एक रुपया भारताच्या 30 पैशांच्या बरोबरीचा आहे. तर एक अमेरिकन डॉलर 277 पाकिस्तानी रुपयांबरोबर आहे. या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Pakistan Financial Crisis

सन 2011 पासून पाकिस्तानवरील कर्द दुपटीने वाढले आहे. मागील वर्षात आयएमएफने तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. या कर्जाची मुदत लवकरच संपणार आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार मूडीजने केलेले देशातील परिस्थितीचे आकलन नव्या सरकारसाठी डोकेदुखी ठरणारे आहे. पाकिस्तानात कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी अस्थिरता कायम राहणार असल्याचे मूडीजचे निरीक्षण आहे. 2024 मध्ये पाकिस्तानला जवळपास 49.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करायचे आहे. या कर्जावरील व्याजाची रक्कमच जवळपास 30 टक्के आहे.

Leave a Comment