Pakistan Elections : पाकिस्तानात (Pakistan Elections) नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. निकालही आले आहेत. मात्र या निकालात फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे येथील राजकारण तापलं आहे. त्यामुळेच मतमोजणी होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही येथे सरकारचा अजूनही पत्ता नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) तुरुंगात आहे. शाहबाज शरीफ पुन्हा (Shehbaz Sharif) पंतप्रधान होतील तर असिफ जरदारी राष्ट्रपती होतील अशी शक्यता आहे. पीएमएलएन आणि पीपीपी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Pakistan Elections)
शाहबाज शरीफ म्हणाले, आता ही जबाबदारी पेलण्याची संधी आहे. या पद्धतीने देशाला संकटातून बाहेर काढायचे आहे. पाकिस्तानात माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो यांचा (Bilawal Bhutto) पीपीपी पक्ष यांच्यात एक करार झाला आहे. मात्र सत्ता वाटपावर अजूनही निर्णय झालेला नाही.
Pakistan Financial Crisis : कर्ज संपलंं, आता फक्त 30 दिवस; पाकिस्तानसमोर कोणतं संकट?
Pakistan Elections
दोन्ही पक्षांत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सहमती बनली. निवडणुका होऊन बारा दिवस उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापन करता आलेले नाही. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार सर्वाधिक संख्येने जिंकले आहेत. दोन नंबरवर पीएमएलएन आणि त्यानंतर बिलावल भुट्टो यांचा पक्ष आहे. या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्याने केला आहे.
Pakistan Elections
निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना विजयी आणि विजयी झालेल्या उमेदवारांना पराभूत करण्यात आल्याचा दावा लियाकत चठ्ठा यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तर काही विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या या कारभाराविरोधात निदर्शनेही केली. इतकेच नाही तर काही ठिकाणची मतमोजणीही रद्द करावी लागली तर काही जिंकलेल्या उमेदवारांनी स्वतःहून माघार घेतली.
Pakistan Elections
या सगळ्या गोंधळात पाकिस्तानची निवडणूक अडकली आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांत सत्तावाटपाचे गणित जुळलेले नाही. त्यामुळे देशाचा पंतप्रधान कोण होणार, सरकार कधी अस्तित्वात येणार हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ पुढील पंतप्रधान असतील असे सांगण्यात येत आहे.
Pakistan Elections
दरम्यान, निवडणुकीतील फसवणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. 29 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या नॅशनल अॅसेंब्लीच्या अधिवेशनात फक्त 133 सदस्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होऊ शकते. सर्वात मोठा पक्ष म्हणून पीएमएल-एन सरकार स्थापनेच्या दाव्यासह आघाडीवर आहे.
या निवडणुकीत पीएमएल-एनने 75 जागा जिंकल्या आहेत. काही अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. 54 जागा जिंकणारा पीपीपी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 17 सदस्यांसह एमक्यूएमचाही पाठिंबा आहे. असे संख्याबळ असताना शाहबाज शरीफ यांना बहुमत सिद्ध करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे. (Pakistan Elections)