Pakistan Election | पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खानला धक्का; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा मोठा विजय

Pakistan Election : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय (Pakistan Election) मिळवल्यानंतर पीएमएलएन पक्षाने पोटनिवडणुकांतही दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पीएमएलएन पक्षाने मोठे वर्चस्व मिळवले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वातील पक्षाने पोटनिवडणुकीत दोन राष्ट्रीय संसदेच्या जागा आणि दहा प्रांतीय विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, हा दावा काही मीडिया रिपोर्टनुसार करण्यात आला आहे. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांना (Imran Khan) मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानमधील पंजाब, खैबर पख्तुनख्वामधील प्रत्येकी दोन राष्ट्रीय संसदेच्या जागा आणि सिंधमधील एका राष्ट्रीय संसदेच्या जागेसह देशातील एकूण पाच राष्ट्रीय संसदेच्या जागांवर पोटनिवडणूक झाली. पंजाब प्रांतातील 12 विधानसभेच्या जागांवर पख्तुनख्वामधील दोन विधानसभा जागांवर आणि बलुचिस्तानच्या दोन विधानसभेच्या जागांवरही पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकांमध्ये शरीफ यांच्या पक्षाने राष्ट्रीय संसदेच्या दोन आणि विधानसभेच्या दहा जागा जिंकण्याची माहिती मिळाली आहे.

Canada Accused Pakistan : कॅनडाच्या निशाण्यावर पाकिस्तान; सरकारच्या ‘त्या’ दाव्याने पाकिस्तानात खळबळ!

Pakistan Election

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार पीएमएलएन पक्षाने दोन राष्ट्रीय संसदेच्या जागा जिंकल्या आहेत. पीपीपी आणि अन्य एका पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. तसेच एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे. विधानसभेच्या जागांपैकी पीएमएलएनने पंजाबमध्ये नऊ जागा आणि बलुचिस्तानमध्ये एक जागा जिंकली आहे.

या पोटनिवडणुकीत देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्याही घटना घडल्या. या हिंसाचारात पीटीआय आणि पीएमएलएन समर्थकांमध्ये झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेक ठिकाणी इंटरनेट बंद केले होते. याशिवाय अनेक ठिकाणी मोबाईल इंटरनेट सेवांवरही बंदी घालण्यात आली होती. पंजाबमधील दोन राष्ट्रीय संसदेच्या जागा पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि मरियम नवाज यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या होत्या. शहबाज शरीफ यांनी पंजाब विधानसभेच्या दोन जागा सोडल्यानंतर या जागांवर पोटनिवडणूक झाली.

Pakistan Election

Pakistan : खर्च कमी करण्याची भन्नाट आयडिया; पाकिस्तान सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Leave a Comment