दिल्ली : पाकिस्तानमध्ये सत्ता बदल घडला असला तरी त्यामुळे देशासमोरील अडचणी काही मिटलेल्या नाहीत. देशावरील विदेशी कर्ज (Loan) प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नव्या सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत. या सरकारसाठीही विदेशी कर्ज अडचणीचे ठरले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वातील तत्कालीन सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की देशाची चार वर्षे अक्षरशः वाया गेली.
रेडिओ पाकिस्तानच्या (Pakistan) वृत्तानुसार, फैसलाबाद येथे एका कार्यक्रमात ते म्हणाले, की तत्कालीन सरकारने अत्यंत अस्थिर आणि दररोज बदलत्या कर धोरणांद्वारे अर्थव्यवस्थेला (Economy) मोठ्या संकटात टाकले. मंत्री म्हणाले की, इम्रान खान यांनी देशाला महागाईच्या संकटात टाकले आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की आधीच्या सरकारने फक्त खोटी आश्वासने दिली जी पूर्णपणे अपयशी ठरली. ते म्हणाले की, इम्रान खान सरकारच्या धोरणांमुळे पाकिस्तानवर विदेशी कर्जाचा भार असह्य झाला आहे. जागतिक बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालाबाबतही मंत्र्यांनी चर्चा केली.
ज्यामध्ये जागतिक बँकेने (World Bank) पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या संरचनात्मक कमकुवतपणाबद्दल सांगितले आहे. यामध्ये गुंतवणुकीतील कपातीचाही समावेश आहे. काही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे, की देशांतर्गत मागणीवर दबाव आणि जागतिक वाढत्या किमतींमुळे देशातील महागाई दोन अंकांमध्ये जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये गंभीर आर्थिक संकट आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील नवीन सरकारला दिलासा देत, IMF ने रखडलेले बेलआउट पॅकेज एक वर्षाने वाढ करण्यास आणि कर्जाची रक्कम $8 अब्ज पर्यंत वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानचे (Pakistan) नवे अर्थमंत्री आणि IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा करार केला आहे. आयएमएफने मान्य केले आहे, की हा कार्यक्रम सप्टेंबर 2022 अखेरपासून आणखी नऊ महिने ते एक वर्ष वाढ केला जाईल, तर कर्जाचा (Loan) आकार सध्याच्या $6 बिलियन वरून $8 अब्ज पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.
अर्र.. पाकिस्तान घाबरला..! नव्या पंतप्रधानांनी अमेरिकेबाबत केले मोठे वक्तव्य; जाणून घ्या..