Pakistan Cricket : बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ (Pakistan Cricket) आशिया चषक (Asia Cup 2023) सुरू होण्यापूर्वी जेतेपदाचा दावेदार मानला जात होता. पाकिस्तान संघ एकदिवसीय क्रमवारीत पहिला होता मात्र, या स्पर्धेत संघाची कामगिरी चांगली नव्हती. या संघाला अंतिम फेरीतही मजल मारता आली नाही. सुपर-4 मध्ये भारत (Team India) आणि श्रीलंका (Sri Lanka) या दोघांकडून पाकिस्तानचा पराभव झाला. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या विश्वचषकबद्दल (World Cup 2023) बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही, परंतु आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना संधी मिळू शकते. लेगस्पिनर अबरार अहमदचा संघात समावेश केला जाऊ शकतो. त्याने 6 कसोटी सामन्यात 38 विकेट्स घेतल्या आहेत मात्र त्याला एकदिवसीय सामन्याचा अनुभव नाही.
प्रथमच संपूर्ण एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. बाबर आझम आणि मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांच्यातील बैठकीनंतर अबरार अहमदचा संघात समावेश करण्यावर सहमती बनली. वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ एक-दोन दिवसांत जाहीर होऊ शकतो. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना आशिया चषकात विशेषत: उपकर्णधार शादाब खानला चांगली कामगिरी करता आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अबरार अहमद सध्या पाकिस्तानच्या देशांतर्गत प्रथम श्रेणी टूर्नामेंटमध्ये भाग घेत आहे. विश्वचषकामुळे त्याला भविष्यातील सामन्यांमध्ये न खेळण्यास सांगितले आहे.
आशिया चषकाबद्दल बोलायचे तर उपकर्णधार आणि लेग स्पिनर शादाब खानची कामगिरी खूप खराब होती. त्याला 5 सामन्यात 41 च्या सरासरीने फक्त 6 विकेट घेता आल्या. ऑफस्पिनर इफ्तिखार अहमदने 4 विकेट घेतल्या. दुसरीकडे, भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 11 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या आणि तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू देखील ठरला. सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 25 धावांत 5 विकेट. कुलदीपने पाकिस्तानविरुद्धच हे प्रदर्शन केले होते. तर श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू ड्युनिथ वेलालगे याने 10 विकेट्स घेतल्या.
वर्ल्डकप भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत येथे फिरकी गोलंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत. पण 25 वर्षीय लेगस्पिनर अबरार अहमदला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्याने 12 सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. एकूण 21 टी-20 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. अबरारने पाकिस्तानसाठी आतापर्यंत फक्त 6 कसोटी खेळल्या आहेत. 114 धावांत 7 विकेट ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दोन वेळा 5 आणि एकदा 10 विकेट्स घेतल्या आहेत.