Pakistan : दहशतवादाला कायमच खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानची (Pakistan) परिस्थिती आता अत्यंत खराब झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. जागतिक बँकेने (World Bank) पाकिस्तानच्या खराब आर्थिक स्थितीबाबत इशारा दिला आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानमधील गरिबी (Pakistan’s Poverty) 39.4 टक्क्यांपर्यंत वाढली आणि खराब आर्थिक स्थितीमुळे 1.20 कोटींहून अधिक लोकांना याचा फटका बसला. जागतिक बँकेच्या मते पाकिस्तानातील गरिबी एका वर्षात 34.2 टक्क्यांवरून 39.4 टक्क्यांपर्यंत वाढली असून 12 दशलक्षाहून अधिक लोक (Pakistan People) दारिद्र्यरेषेखाली आहेत. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये सुमारे 9.5 कोटी लोक गरिबीत राहतात.
जागतिक बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल आता गरिबी कमी करण्यास सक्षम नाही आणि समवयस्क देशांच्या तुलनेत जीवनमान घसरले आहे. टोबियास हक म्हणाले की, जागतिक बँकेने अडचणीत असलेल्या पाकिस्तानला आर्थिक सुरक्षितता मिळविण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले.
नेजी बेन्हासीन काय म्हणाले ?
ते म्हणाले की जागतिक बँक पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खूप काळजीत आहे. पाकिस्तान आर्थिक आणि मानवी विकासाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमधील जागतिक बँकेचे संचालक नेजी बेन्हासीन म्हणाले की, पाकिस्तानसाठी धोरणात्मक बदल करण्याचा हा क्षण असू शकतो.