PAK vs ENG Live: मुंबई : पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच इंग्लंडचे वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि डेव्हिड मलान हा सामना खेळणार नाहीत.
- हे रेकॉर्ड आज करता येतील :
- बेन स्टोक्स 44 धावा करताच आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3000 धावा पूर्ण करेल.
- तीन विकेट घेताच शादाब खान आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 100 बळी घेईल. यासह त्याच्या 44 धावा होताच त्याच्या 500 धावा पूर्ण होतील. त्याने आतापर्यंत 84 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.
- इंग्लंडने विजेतेपद पटकावल्यास प्रशिक्षक मॅथ्यू मॉट हे एकाच वर्षी दोन विश्वचषक विजेतेपदावर संघांचे नेतृत्व करणारे जगातील पहिले प्रशिक्षक असतील. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन महिला संघाने एप्रिलमध्ये न्यूझीलंडमध्ये 50 षटकांचे विश्वविजेतेपद पटकावले होते.
याआधी टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड दोनदा आमनेसामने आले आहेत. 2009 आणि 2010 या दोन्ही वेळा इंग्लंडने बाजी मारली होती. T20 बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही देशांमध्ये एकूण 28 सामने झाले आहेत. यामध्ये इंग्लंडने 18 वेळा विजय मिळवला आहे (एक सामना बरोबरीत असताना ओव्हर एलिमिनेशनद्वारे जिंकला आहे) आणि पाकिस्तानने नऊ वेळा विजय मिळवला आहे, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. विश्वचषकापूर्वी इंग्लंडने सात सामन्यांच्या T20 मालिकेत पाकिस्तानचा घरच्या मैदानावर 4-3 असा पराभव केला होता.