मुंबई : पाकिस्तानने पाचव्या षटकात 29 धावांवर पहिली विकेट गमावली. सॅम कुरनने मोहम्मद रिझवानला बोल्ड केले. चेंडू रिझवानच्या बॅटला लागून विकेटला लागला. रिझवानला 14 चेंडूत 15 धावा करता आल्या. सध्या मोहम्मद हरिस आणि बाबर आझम क्रीजवर आहेत. पाच षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 29 धावा आहे.
T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने खेळत आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात असून दोन्ही संघांनी यापूर्वी प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकला आहे. 2009 मध्ये पाकिस्तान आणि 2010 मध्ये इंग्लंड T20 चॅम्पियन बनले होते. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. जगभरात याची उत्सुकता आहे.
इंग्लंड: जोस बटलर (w/c), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.