PAK Vs ENG Final मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू मॉट यांनी रविवारी आणखी एक इतिहास रचला. एका वर्षात दोन विश्वचषक जिंकणारा तो पहिला प्रशिक्षक ठरला असून त्याच्या प्रशिक्षणात इंग्लंड संघाने मेलबर्नमध्ये पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. मॉटने या वर्षी एप्रिलमध्येही ऑस्ट्रेलियन महिला संघाला वनडेमध्ये विश्वविजेते बनवले होते. ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये खेळली गेली. त्याचीच आता अनेकांना आठवण येत आहे.
पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर इंग्लिश संघ दुसऱ्यांदा टी-20 चॅम्पियन बनला असून यापूर्वी त्यांनी 2010 मध्ये विजेतेपद पटकावले होते. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू मॉटची वनडे आणि टी-20 प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली, तेव्हा तो टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघाला चॅम्पियन बनवेल, असे कोणालाही वाटले नव्हते. कारण, मॉट प्रशिक्षक बनल्यानंतर काही दिवसांनी 2019 विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गनने निवृत्ती जाहीर केली. विश्वचषकासाठी संघाची तयारी करण्याचे आव्हान मोटसमोर होते. परंतु, त्यांनी मोट बांधली. जोस बटलर संघाचा नवा कर्णधार झाला. मोट आणि बटलर या जोडीने टी-20 विश्वचषकात मोठ्या संघांना पराभूत करून विजेतेपद पटकावले.
पॉल कॉलिंगवूडपेक्षा मॉटला प्राधान्य देण्यात आले. वेस्ट इंडिजमधील टी-20 मालिकेत कॉलिंगवूडची इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 48 वर्षीय मॉट ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून सात वर्षे घालवल्यानंतर इंग्लंडमध्ये दाखल झाले.
- ऑस्ट्रेलिया महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मॅथ्यू मॉटची कामगिरी:
- 2015: ऍशेस
- 2017-18: अॅशेस
- 2018: T20 विश्वचषक
- 2019: ऍशेस
- 2020: T20 विश्वचषक
- २०२१-२२: अॅशेस
- 2022: एकदिवसीय विश्वचषक
- वनडेमध्ये सलग २६ विजयांचा विक्रम