Paddy straw । पशुपालकांनो सावधान! दुभत्या जनावरांना कमी प्रमाणात खायला द्या भाताचा पेंढा, नाहीतर होईल दुधाचे प्रमाण कमी

Paddy straw । जर तुम्ही पशुपालन करत असाल तुम्ही पशूंची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही पशूंच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागतो. तुम्ही दुभत्या जनावरांना भाताचा पेंढा कमी प्रमाणात खायला द्या. नाहीतर दुधाचे प्रमाण कमी होईल.

करा युरियाचा उपचार

पशुपालकांनी हे लक्षात ठेवावे की, उपचारामुळे पेंढ्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि पेंढा मऊ, चवदार आणि प्रथिनांनी समृद्ध होतो. इतकेच नाही तर ऑक्सलेटचे प्रमाणही कमी होते. तुम्ही त्यावर सोप्या पद्धतीने उपचार करू शकता. कसे ते जाणून घ्या.

  • सर्वात अगोदर 1 क्विंटल पेंढा जमिनीवर 6 इंच थरात पसरवा.
  • 4 किलो युरिया 50 लिटर पाण्यात पूर्णपणे विरघळवून चाळणीच्या साहाय्याने पेंढ्यावर ते व्यवस्थित ओतून घ्यावे.
  • आता यानंतर, आधीच पसरलेल्या पेंढ्यावर वजन म्हणून 1 क्विंटल पेंढा घालून त्यावर पुन्हा 4 किलो युरिया 50 लिटर पाण्यात विरघळवून, चाळणीतून गाळून फवारणी करावी.
  • अशा प्रकारे, तुम्हाला युरिया द्रावण फवारणी करून, एका वेळी 5-10 क्विंटल पेंढा तयार करता येईल.
  • पेंढ्याचा हा ढीग पॉलिथिनच्या शीटने नीट झाकून ठेवाव. जेणेकरून आतील गॅस बाहेर येणार नाही. हे असेच 20 दिवस राहू द्या.
  • 20 दिवसांनंतर हा पेंढा जनावरांना खाण्यास तयार होतो.

जाणून घ्या उपचारित पेंढा खाण्याचे फायदे

  • प्राणी उपचार केलेला पेंढा मोठ्या प्रमाणात खातात.
  • प्रक्रिया केलेला पेंढा खाल्ला तर ते प्राणी जलद वाढतात.
  • प्रक्रिया केलेला पेंढा खायला दिला तर जनावरांच्या आहारातील धान्याचे प्रमाण कमी केले जाते, ज्यामुळे शेतकऱ्याचे पैसे वाचतील.
  • प्रक्रिया केलेला पेंढा, एकदा तयार केला तर बऱ्याच काळासाठी साठवला जाऊ शकतो.

पेंढा खायला घालताना घ्या ही काळजी

उपचारानंतर, पेंढ्याचा ढीग पॉलिथिनने चांगले झाकून ठेवावा, असे केले तर आतील वायू बाहेर पडू शकत नाहीत.
हे लक्षात ठेवा की खायला देण्यापूर्वी, पेंढा 10 मिनिटे खुल्या हवेत पसरवावा जेणेकरून त्यातील वायू बाहेर पडतील..

Leave a Comment