Overeating Effects on Body : सावधान! भूक नसतानाही विनाकारण खाताय? मग, ‘या’ 6 धोक्यांची माहिती घ्याच!

Overeating Effects on Body : अनेकदा लोक भूक नसतानाही अनावश्यकपणे खाल्ले जाते. कधी (Overeating Effects on Body) मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी तर कधी ताटात शिल्लक राहिलेले अन्न संपवण्यासाठी. अशा अनेक कारणांमुळे भूक नसतानाही अन्नपदार्थ खाल्ले जातात. सध्या फास्टफूड मोठ्या प्रमाणात सेवन केले जात आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळाही बदललेल्या आहेत. अशा परिस्थितीत फास्ट फूडकडे (Fast Food) लोकांचा कल वाढला आहे. भूक नसतानाही खाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. परंतु ही परिस्थिती शरीरासाठी मात्र धोकादायक ठरू शकते. भूक नसतानाही जर अन्नपदार्थ खाल्ले तर काय विपरीत परिणाम होऊ शकतात याची माहिती जाणून घेऊ या.

भूक कशी लागते, समजून घ्या

भूक लागल्यानंतर आपल्याला शरीराकडून तसेच संकेत मिळतात यासाठी दोन हार्मोन्स शरीरामध्ये कार्यरत असतात. घ्रेलिन आणि लेप्टिन हे ते दोन हार्मोन्स आहेत. या हार्मोन्सच्या मदतीने शरीराला भूकेचे संकेत मिळतात. घ्रेलिन आपल्याला भूक लागल्याचे संकेत देते तर लेप्टिन आपल्याला पोट भरल्याचे संकेत देते. काही लोकांना जेवल्यानंतर सुमारे वीस मिनिटे पोट भरल्यासारखे वाटते.

Memory Improve Tips : काहीच लक्षात राहत नाही? काळजी नको, मेमरी तीक्ष्ण करणाऱ्या ‘या’ 5 टिप्स फॉलो करा

Overeating Effects on Body

रक्तातील साखरेची विस्कळीत होते

जेव्हा तुम्ही भूक नसतानाही जेवण करता त्यावेळी रक्तातील साखरेच्या पातळीवर (Blood Sugar Level) त्याचा नकारात्मक परिणाम होतो. विशेषतः प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाताना रक्तातील (Processing Food) साखरेची पातळी गडबडण्याची शक्यता खूप जास्त असते. काही वेळेस रक्तातून साखरेची पातळी अचानक वाढते आणि काही काळानंतर कमी होते. त्यामुळे थकवा आणि चिडचिड जाणवते परिणामी टाईप टू मधुमेहाचा धोका (Type 2 Diabetes) सुद्धा वाढीस लागतो.

वजनावर परिणाम

जास्त खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वजन वाढण्याचाही धोका संभवतो. वास्तविक जेव्हा तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल पाहता पाहता जेवण करता त्यावेळेस नेहमीच जास्त खाल्ले जाते. परंतु तरीही पोट भरल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे अधिकचे अन्न शरीरात जाते याचा दुष्परिणाम शरीरावर होण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊन वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे ही सवय शक्यतो टाळा.

Overeating Effects on Body

पचनसंस्थेवर विपरीत परिणाम

अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले गेल्याने मेंदू पचन प्रक्रियेचे संकेत देऊ शकत नाही आणि पोटातील अन्न पचण्यास सुरुवात होत नाही. त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवू शकते परिणामी पचन क्रिया बिघडते त्यामुळे नेहमीच जेवताना संयम राखला पाहिजे खाद्यपदार्थ चवदार असले तर जास्त खाण्याचे प्रमाण वाढते. परंतु शरीरातील सर्व दोष निर्माण होण्यास हे अधिकचे अन्न देखील कारणीभूत ठरू शकते.

Weight Loss Tips : वाढत्या वजनाने झालात हैराण? काळजी नको, ‘या’ सोप्या फॉलो कराच!

Overeating Effects on Body

झोपेवर परिणाम

2018 मध्ये केलेला एका अभ्यासानुसार अन्नाची इच्छा आणि झोपेची खराब गुणवत्ता यांचा संबंध आहे. अभ्यासानुसार झोपेची गुणवत्ता खराब असलेले सुमारे 60 टक्के सहभागी व्यक्ती झोपण्याआधी फास्टफूड खाण्याचे शौकीन होते. त्यामुळे भूक नसतानाही फास्ट फूड खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता खराब होते असे या अभ्यासातून दिसून आले आहे. जेव्हा तुम्ही अस्वास्थ्यकर अन्नपदार्थ खाता त्यावेळी त्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते तसेच अशा खाद्यपदार्थांमध्ये फॅट आणि साखर जास्त असते त्यामुळे पोषक तत्वे कमी होतात आणि शरीरात या दोन्हींचे प्रमाण वाढते.

Leave a Comment