या वीकेंडला काही खास ट्राय करायचं असेल तर तुम्ही ओट्स वडा घरीच बनवू शकता. हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे, प्रत्येकाला तो खायला आवडेल. मग उशीर काय, ही रेसिपी नक्की करून पहा.
- Food recipe :स्नॅक्समध्ये बनवा “या ” पद्धतीने “शेंगदाणा भजी” आणि चहासोबत चवीचा आस्वाद घ्या
- Food recipe :घरी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी बनवायची आहे , तर मग “ही” रेसिपी एकदा ट्राय कराच
किती लोकांसाठी: 4
साहित्य: 2 कप ओट्स, 2 कप मूग डाळ, 1 कप ब्रेड क्रंब, 250 ग्राम पालक, 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तूप किंवा तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३-४ उकडलेले बटाटे
प्रक्रिया:
- प्रथम पालक धुवून चिरून घ्या.
- आता तवा गरम करून त्यात ओट्स तळून घ्या, थंड झाल्यावर बारीक करा.
- उकडलेले बटाटे मॅश करा, आता चिरलेला पालक ओट्स, आमचूर पावडर, चाट मसाला आणि मॅश केलेले बटाटे मिसळा, चवीनुसार मीठ घाला.
- त्यात उरलेले साहित्यही टाका.
- कढईत तेल गरम करून, या पेस्टपासून वडे बनवून तळून घ्या.
- वाटल्यास चटणीसोबत सर्व्ह करू शकता.