Tiktok : अल्पावधीतच जगभरात लोकप्रिय ठरलेल्या चिनी शॉर्ट व्हिडीओ अॅप टिकटॉकला (Tiktok) फक्त भारतानेच नाही तर अमेरिका (America), कॅनडासारख्या (Canada) देशांनीही दणका दिला आहे. या देशांनी आता भारताचेच अनुसरण करत आपल्या देशात या अॅपवर बंदी घातली आहे.
या आठवड्यात अमेरिका आणि कॅनडाने सरकारने (Chinese App Tiktok Ban in America and Canada) जारी केलेल्या मोबाइल डिव्हाइसवर टिकटॉकच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले. दोन्ही देशांनी डेटा सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत हे पाऊल उचलले आहे.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
Tiktok च्या चीनी कंपनीचे विधान
चिनी कंपनी ByteDance च्या मालकीच्या Tiktok ने असे म्हटले आहे की ते चीनी सरकारसोबत डेटा शेअर करत नाही आणि त्यांचा डेटा चीनमध्ये (China) नाही. इतर सोशल मीडिया कंपन्यांपेक्षा अॅप अधिक वापरकर्त्यांचा डेटा संकलित करत असल्याच्या सर्व आरोपांचे कंपनीने खंडन केले. यासोबतच कंपनी स्वत:च्या व्यवस्थापनाद्वारे स्वतंत्रपणे चालवल्याचा आग्रह धरते.
असे अनेक देश आणि प्रदेश आहेत ज्यांनी TikTok वर आंशिक किंवा पूर्ण बंदी लागू केली आहे. गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या कारणामुळे भारताने 2020 मध्ये टिकटॉक आणि मेसेजिंग अॅप WeChat सह इतर डझनभर चीनी अॅप्सवर बंदी घातली.
तैवान
तैवान (Taiwan) डिसेंबर 2022 मध्ये, FBI ने Tiktok ने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा इशारा दिल्यानंतर तैवानने TikTok वर बंदी लादली. मोबाइल फोन, टॅब्लेट आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरसह सरकारी उपकरणांना चिनी बनावटीचे सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी नाही.
अमेरिका
या आठवड्यात यूएस सरकारी एजन्सींना डेटा सुरक्षेच्या कारणामुळे फेडरल डिव्हाइसेस आणि सिस्टममधून टिकटॉक काढून टाकण्यासाठी 30 दिवसांचा अवधी आहे. ही बंदी केवळ सरकारी उपकरणांवर लागू होते, जरी काही यूएस खासदार पूर्णपणे बंदी घालण्याची वकिली करत आहेत.
कॅनडा
त्याच वेळी अमेरिकेच्या घोषणेनंतर, कॅनडाने सोमवारी जाहीर केले की सरकारने जारी केलेल्या उपकरणांनी टिकटॉक वापरू नये. गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी ‘न स्वीकार्य’ धोका असल्याचे कारण सरकारने नमूद केले आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना भविष्यात अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यापासूनही रोखले जाणार आहे.
युरोपियन युनियन
युरोपियन संसद, युरोपियन कमिशन आणि युरोपियन युनियन कौन्सिल, युरोपियन युनियनच्या तीन प्रमुख संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या उपकरणांवर टिकटॉकवर बंदी घातली आहे. युरोपियन संसदेने मंगळवारी जाहीर केलेली बंदी 20 मार्चपासून लागू झाली आहे. त्यांनी खासदार आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक उपकरणांमधून अॅप काढून टाकण्याची शिफारस केली आहे.
पाकिस्तान
चीनचा मित्र देश असलेल्या पाकिस्ताननेही ऑक्टोबर 2020 पासून किमान चार वेळा टिकटॉकवर तात्पुरती बंदी घातली आहे.
अफगाणिस्तान
दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या तालिबान नेतृत्वाने 2022 मध्ये टिकटॉक आणि चायनीज गेम PUBG वर बंदी घातली.