Osmanabad Lok Sabha Constituency : धाराशिव मतदारसंघात (उस्मानाबाद) उद्धव ठाकरे गटाने विद्यमान (Osmanabad Lok Sabha Constituency) खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले आहे. ओमराजे निंबाळकर यांना कोण टक्कर देणार याचा निर्णय मात्र महायुतीला अजूनही घेता आलेला नाही. या जागेबाबत चर्चा करण्यासाठी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची (Devendra Fadnavis) भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत तर दुसरीकडे सुरेश बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगला गाठला आहे. त्यामुळे धाराशिव मतदार संघातील उमेदवारीचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेत आला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादी काँग्रेसने जगजीत सिंह पाटील यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी दणदणीत विजय मिळवला. महायुतीमध्ये धाराशिवची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत होती मात्र खासदार राजे निंबाळकर उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray) आहेत त्यामुळे या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. मात्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपा प्रवेश केल्याने या मतदारसंघात आता भाजपाची ताकद देखील वाढली आहे.
Madha Lok Sabha : माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला पण, ‘मविआ’त तिढा?, शरद पवारांच्या मनात काय..
Osmanabad Lok Sabha
त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडून मागितला जाऊ शकतो अशी शक्यता दिसून येत आहे. परंतु जागावाटपात जर हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला तर सुरेश बिराजदार यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. परंतु जर ही जागा भाजपने लढवली तर पुन्हा एकदा राणा जगजीत सिंह पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
सुरेश बिराजदार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत तर राणा जगजितसिंह पाटील भाजपकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु या मतदारसंघात जागावाटप अजून झालेले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाईल याची निश्चित माहिती अजून नाही. जर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला तर सुरेश बिराजदार हे उमेदवार असतील. परंतु जर भाजपने हा मतदारसंघ स्वतःकडे खेचून घेतला तर राणा जगजीत सिंह पाटील निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज राणा जगदीश सिंह पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या दोन्ही नेत्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Osmanabad Lok Sabha
या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील हे विजयी झाले होते. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती या मोदी लाटेत रवींद्र गायकवाड यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही शिवसेनेनेच बाजी मारली होती.