Osmanabad Lok Sabha Archana Patil : अखेर महायुतीने उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा (Osmanabad Lok Sabha) सोडवला आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना (Archana Patil) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही उमेदवारी जाहीर करण्या आधी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
महायुतीमध्ये धाराशिव मतदारसंघाचा तिढा निर्माण झाला होता. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला होता. महाविकास आघाडीने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना (Om Raje Nimbalkar) पुन्हा तिकीट दिले आहे. परंतु महायुतीचा उमेदवार मात्र ठरत नव्हता. तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील हे यासाठी इच्छुक होते आणि आणखीही काही नावे चर्चेत होती. परंतु उमेदवारी कुणाला द्यायची? जागावाटपत हा मतदारसंघ कोणाकडे जाणार? याचा निर्णय महायुतीत झालेला नव्हता.
Osmanabad Lok Sabha : ठाकरेंच्या शिलेदाराला कोण टक्कर देणार? महायुतीचं अजून काही ठरेना…
Osmanabad Lok Sabha
त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यात विलंब होत होता. या सगळ्या घडामोडीत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत होते. त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्चना पाटील यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केली आता धाराशिवच्या मैदानात महायुतीकडून अर्चना पाटील यांच्या रूपाने एक तुल्यबळ उमेदवार देण्यात आला आहे.
कोण आहेत अर्चना पाटील?
अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष होत्या. परंतु सध्याच्या काळात त्या राजकारणात भाषा सक्रिय नव्हत्या तसेच कोणत्याही राजकीय पदावर देखील नव्हत्या. धाराशिव जिल्हा आणि परिसरातील महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. तुळजापूर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. आता उमेदवारी मिळाल्याने त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीने धाराशिव मतदारसंघातील यंदाची निवडणुकीची अटीतटीची होणार अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.
Osmanabad Lok Sabha