Organic Fertilizer : भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात. पशुपालनाच्या माध्यमातून तुम्हाला चांगली कमाई करता येईल. जर तुम्हाला चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्ही सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रिय खत आरोग्यासाठी उत्तम आहे.
या गोष्टींपासून तयार करा सेंद्रिय खत
सेंद्रिय खत स्वत: तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला प्रथम गाईचे किंवा म्हशीचे शेण आवश्यक आहे. यासोबतच गोमूत्रही गोळा करावे लागते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी योग्य माती आणि खराब झालेल्या कडधान्यांसह, लाकडाचा भुसा गरजेचा आहे. कंपोस्ट कंपोस्ट तयार करण्यासाठी दही आणि गुळाची गरज आहे. हे खत बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा ड्रम घ्या.
अशी करा प्रक्रिया
हे लक्षात घ्या की सेंद्रिय खत तयार करण्यासाठी शेण, गोमूत्र, गूळ, कडधान्ये आणि लाकडाचा भुसा एकत्र मिसळावा लागतो. ते तयार करण्यासाठी तुम्हाला सुमारे 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र आणि 1 किलो गूळ लागणार आहे. तुम्हाला आता हे संपूर्ण मिश्रण १ किलो मातीत मिसळावे लागणार आहे. ते मिसळण्यासाठी तुम्ही स्टिक वापरू शकता.
सूर्यापासून करा संरक्षण
प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये सेंद्रिय खत तयार करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण मिश्रण तयार केल्यावर ते झाकून ठेवावे लागेल. हे लक्षात घ्या की सुमारे 20 दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवा. सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी ड्रम ठेवावा लागेल. समजा तुम्ही ते सूर्यप्रकाश येत असणाऱ्या ठिकाणी ठेवले तर तुमचे सर्व कष्ट खराब होऊ शकतात. इतकेच नाही तर सेंद्रिय खताचे मिश्रण काही दिवसांच्या अंतराने ढवळत राहावे. तुमचे स्वयंनिर्मित सेंद्रिय खत ड्रममध्ये ठेवल्यानंतर सुमारे 20 दिवसात तयार होते.