Oral Health : सावधान! दातांमध्ये होणाऱ्या ‘या’ समस्या देतात मोठ्या आजारांना निमंत्रण, वेळीच घ्या उपचार

Oral Health : आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो. अनेकजण दात साफ करण्यास टाळाटाळ करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसेल. दातांमध्ये होणाऱ्या काही समस्या मोठ्या आजारांना निमंत्रण देतात. तुम्ही वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

श्वासाची दुर्घंधी येणे

अनेकांच्या तोंडाला दुर्गंधी येते. अनेकदा तोंडाच्या स्वच्छतेमुळे असे होते. कधीकधी ते हिरड्यांचे आजार सूचित करते. इतकेच नाही तर पचनाच्या समस्यांमुळे श्वासाची दुर्गंधी देखील येते.

जबड्यात होते वेदना

अनेक वेळा, जेव्हा तुम्ही खूप जड काहीतरी खाता त्यावेळी तुम्हाला तुमच्या जबड्यात वेदना होऊ लागतात. इतकेच नाही तर जबड्यात दुखणे हे सांधेदुखी किंवा तणावामुळेही होऊ शकते.

दात होतात पिवळसर

दातांमध्ये पिवळसरपणा खूप विचित्र दिसतो. असे झाले तर तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्वही खराब होण्याची शक्यता असते. अनेक वेळा दात नीट स्वच्छ न केल्यामुळे पिवळेपणाची तक्रार सुरू होते, पण जर तुमचे दात गरजेपेक्षा जास्त पिवळे होत असतील तर ते यकृताच्या समस्येचे संकेत देतात.

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे

हिरड्यांमधून रक्त येणे ही एक मोठी समस्या असून जर तुमच्या हिरड्यांमधून दररोज रक्त येत असल्यास तर ते हिरड्यांना आलेले लक्षण असू शकते.

फोड येणे

अनेक वेळा पोट नीट साफ झाले नाही तर तोंडात व्रण तयार होऊ लागतात. पण प्रत्येक वेळी फोड येणे हे पोटाच्या आजाराचे लक्षण नाही. काहीवेळा एचआयव्ही आणि स्वयंप्रतिकार रोगांमुळे देखील फोड येण्याची शक्यता असते.

दात दुखणे

दात दुखणे हे पोकळी आणि संसर्गाचे लक्षण असते. जर तुम्हाला दररोज दातांमध्ये तीव्र वेदना होत असल्यास तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे.

Leave a Comment