Oppo Reno 8T 5G : आज भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांना OPPO स्मार्टफोन खूप आवडत आहे. यामुळे बाजारात या कंपनीचे अनेक फोन धुमाकूळ घालताना दिसत आहे.
कंपनीचा असाच एक स्मार्टफोन म्हणजे Oppo Reno 8T 5G होय. बाजारात हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. सध्या या जबरदस्त स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. ज्याचा तूम्ही फायदा घेत अगदी कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी जबरदस्त फिचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करु शकतात.
हे जाणुन घ्या की फ्लिपकार्टवर सूरु असणाऱ्या सुपर वाल्व डेज सेलमध्ये या स्मार्टफोन जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.
या सेलमध्ये तुम्ही Oppo Reno8T 5G अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते.
OPPO Reno8T 5G ऑफर
फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरून तुम्ही हा फोन (128GB + 8GB RAM) ₹ 29,999 मध्ये खरेदी करू शकता. स्मार्टफोनची MRP 38,999 रुपये आहे आणि तुम्ही 23% डिस्काउंटनंतर 29,999 रुपयांना खरेदी करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा फायदा घेऊन फोनची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते. तुम्हाला फेडरल बँक आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 10% झटपट सूट मिळेल. तुम्ही दरमहा ₹ 5,000 नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत फोन देखील खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5% अमर्यादित कॅशबॅक मिळत आहे.
OPPO Reno8T 5G एक्सचेंज ऑफर
एक्स्चेंज ऑफर अंतर्गत तुम्ही अतिशय स्वस्त किंमतीत फोन देखील खरेदी करू शकता. जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला हा फोन स्वस्तात मिळेल. त्याऐवजी, तुम्हाला ₹ 28,600 ची सूट मिळत आहे. पूर्ण परतावा तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असतो
OPPO Reno8T 5G तपशील
Oppo Reno 8T 5G मध्ये 6.7 इंच फुल HD+ डिस्प्ले समाविष्ट आहे. याशिवाय फोनमध्ये 108MP चा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे. तर 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 4800 mAh बॅटरी देण्यात आली आहे.