Oppo Reno 10 Pro 5G । ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येईल ओप्पोचा हा महागडा फोन, जाणून घ्या ऑफर

Oppo Reno 10 Pro 5G । ओप्पो ही सर्वात आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. कंपनी सतत विविध स्मार्टफोन लाँच करत असते. काही दिवसांपूर्वीच कंपनीने Oppo Reno 10 Pro 5G हा फोन लाँच केला होता. कंपनीचा आता हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

7,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल फोन

Oppo ने भारतात जुलै 2023 मध्ये Oppo Reno 10 सीरीज लाँच केली होती. Oppo Reno 10 Pro देखील या सिरीजमध्ये समाविष्ट केला होता. कंपनीने हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह एकाच प्रकारात लॉन्च केला होता. किमतीचा विचार केला तर लॉन्चच्या वेळी त्याची किंमत 39,999 रुपये होती. काही काळापूर्वी कंपनीने त्याची किंमत 2000 रुपयांनी कमी केली होती पण आता तो आणखी स्वस्त केला जाईल.

Oppo Reno 10 Pro 5G (Silvery Grey) सध्या Amazon वर फक्त Rs 32,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनवर अनेक बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही फोनची किंमत आणखी कमी करता येईल. तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी करू शकता. ग्लॉसी पर्पल कलर व्हेरिएंट Amazon वर 34,990 रुपयांना मिळेल.

AMOLED डिस्प्ले आणि हेवी रॅम

कंपनीच्या फोनमध्ये 6.7-इंचाचा 3D AMOLED डिस्प्ले दिला असून जो फुल एचडी प्लस (1080×2412 पिक्सेल) रिझोल्यूशनसह येतो. डिस्प्ले 240 Hz टच सॅम्पलिंग रेट, 120 Hz रिफ्रेश रेट आणि 950 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. फोनच्या डिस्प्लेच्या मध्यभागी एक पंच-होल कटआउट असून ज्यात सेल्फी कॅमेरा दिला आहे. कंपनीने हा फोन एकाच प्रकारात लॉन्च केला आहे, ज्यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे.

मिळेल शक्तिशाली कॅमेरा

कंपनीचा हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करेल. हे 5G सपोर्टसह येते. फोन Android 134 वर आधारित ColorOS 13.1 वर काम करतो आणि कंपनीच्या फोनमध्ये OIS सह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 32-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स दिली आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये 32-मेगापिक्सेल लेन्स दिली असून या फोनमध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4600 mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की फोन 10 मिनिटांत 48 टक्के चार्ज होतो.

Leave a Comment