OPPO A59 : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर ही ऑफर खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता Oppo चा OPPO A59 हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ज्यात 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरी मिळेल.
जाणून घ्या किंमत आणि ऑफर
हे लक्षात ठेवा की रॅमनुसार हा फोन दोन प्रकारात खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आहे. तसेच या दोन्ही मॉडेल्समध्ये 128GB स्टोरेज मिळेल. तुम्ही ते सिल्क गोल्ड आणि स्टाररी ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.
तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन व्यतिरिक्त, तुम्हाला हा फोन कंपनीच्या अधिकृत साइट आणि ऑफलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या फोनवर 1399 रुपयांची झटपट सवलत देत आहेत. बँकेच्या या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला फक्त 12,600 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच दोन्ही प्लॅटफॉर्मवर, ही ऑफर 31 मे 2024 पर्यंत HDFC, ICICI, Axis आणि SBI बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर उपलब्ध असणार आहे.
OPPO A59 5G ची खासियत
फोनमध्ये 6.59-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला असून जो HD Plus रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 600 nits पीक ब्राइटनेस सपोर्टसह येईल. कंपनीचा हा फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो Mali-G57 MC2 GPU सह जोडण्यात आला आहे. हा फोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB अशा दोन भिन्न प्रकारांमध्ये येतो. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच हा फोन ColorOS 13.1 वर काम करतो, जो Android 14 वर आधारित आहे.
फोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात 13-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर मिळेल. फोनमध्ये 8-मेगापिक्सेल लेन्स आहे. फोन 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला असून यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हे धूळ आणि पाणी प्रतिरोधक IP54 रेटिंगसह येते.