Oppo A38 : स्वस्तात खरेदी करा 50MP कॅमेरा असलेला Oppo चा फोन, किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित

Oppo A38 : जर तुम्ही नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता Oppo A38 हा फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. Amazon वर अशी शानदार ऑफर मिळत आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

किमतीचा विचार केला तर या डिस्काउंटनंतर फोनची किंमत 10 हजार रुपये इतकी होते. तसेच कंपनीकडून या फोनवर बंपर एक्सचेंज बोनस देखील देण्यात येत आहे. लक्षात ठेवा की बदल्यात मिळणारी अतिरिक्त सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे. तसेच या कंपनीच्या फोनचा EMI 533 रुपयांपासून सुरू होतो.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo च्या या फोनमध्ये 1612×720 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.56 इंच HD+ डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश दर आणि 720 nits च्या शिखर ब्राइटनेस पातळीसह येतो. स्टोरेजचा विचार केला तर फोन 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट देत असून फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देत आहे.

कंपनीच्या या जबरदस्त फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा AI मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा दुय्यम सेन्सरचा समावेश आहे. फोनमध्ये देण्यात आलेला फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असणारा कंपनीचा हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 5, Bluetooth 5.3, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखी फीचर्स दिली आहेत.

Leave a Comment