Opening Bell : शेअर बाजाराच्या (Stock Market) सुरुवातीच्या व्यापारात, निफ्टीचे (Nifty) ५० पैकी ३२ समभाग हिरव्या चिन्हावर (Green sign) व्यवहार करताना दिसले तर उर्वरित १८ समभाग लाल (Red Sign) चिन्हावर व्यवहार करताना दिसले. भारतीय शेअर्समधील (Indian shares) वाढ मुख्यत्वे आयटी (IT) आणि बँकिंग शेअर्समधील (BAnking share) वाढीमुळे झाली.
- Market Closing Bell : निफ्टी आणि सेन्सेक्स आज हिरव्या रंगात बंद
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Market closing Bell : महागाई कमी करण्याच्या आश्वासनानंतर बाजारात तेजी
- Technology : चीनला मोठा झटका..! जगातील ‘या’ दिग्गज कंपनीबाबत भारताबाबत घेतला ‘हा’ निर्णय
शेअर बाजाराने सलग सहाव्या दिवशी आपली धार कायम ठेवली आहे. बँकिंग (Banking) आणि वित्तीय क्षेत्रातील (Financial sector) समभागांची मजबूती आणि आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांच्या तुलनेने चांगले परिणाम यामुळे बाजाराला आधार मिळाला आहे. शुक्रवारी, सकाळी ९.४५ वाजता, सेन्सेक्स (Sensex) २७२.५० अंकांच्या वाढीसह ५९४७५.४० वर व्यवहार करत होता. अशा प्रकारे ते ०.४६ टक्के वाढले. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) ०.४१% (सुमारे ७१.८० अंक) च्या मजबूतीसह १७६३५.७५ अंकांवर व्यवहार करत आहे.
दुसऱ्या तिमाहीत आयटी कंपन्यांच्या (IT Company) चांगल्या निकालानंतर (Result) आता आघाडीच्या बँकांचे दुसऱ्या तिमाहीचे निकालही सकारात्मक दिसत आहेत. कॉर्पोरेट (Corporate) कमाईच्या संदर्भात बाजार सकारात्मक(Positive Market) असल्याचे यावरून दिसून येते. अॅक्सिस बँक (Axis Bank) आणि आयटीसीच्या (ITC) निकालांनी (Result) दुसऱ्या तिमाहीतील अंदाजांना मागे टाकले.
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services) मुख्य गुंतवणूक रणनीतीकार (Chief Investment Strategist) व्ही.के.विजयकुमार (V. K. Vijaykumar) यांच्या मते, पीएयू बँक निर्देशांक (PSU Bank Index) देखील आपली मजबूत कामगिरी सुरू ठेवण्याची क्षमता दर्शवितो. रुपयाही (Rupee) विक्रमी नीचांकी पातळीवरून सावरण्यास सुरुवात झाली आहे.
आज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर एकूण १५२१ समभागांमध्ये व्यापार सुरू झाला, त्यापैकी सुमारे ८८५ शेअर्स वाढीसह आणि ५२६ शेअर्स घसरणीसह उघडले. त्याच वेळी, ११० कंपन्यांच्या समभागांची किंमत काहीही फरक बघायला मिळाला नाही. याशिवाय आज ६० शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर तर ८ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, सकाळपासून ८१ शेअर्समध्ये अपर सर्किट (Upper Circuit) तर ५५ शेअर्समध्ये लोअर सर्किट (Lower Circuit) आहे.