Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसापूर्वी शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने कंगनाला भाजपकडून फटकारण्यात करण्यात आले होते. तर एका मुलाखतीमध्ये कंगनाने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.
देशभरात जात जनगणनेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ‘जातीच्या जनगणनेची गरज नाही’ असे म्हटले आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली असून ‘जातीय जनगणनेबाबत भाजपची खरी भूमिका समोर आली आहे’. असं काँग्रेसने म्हटले आहे.
एका मुलाखतीत ती म्हणाली की, ‘माझ्या आजूबाजूच्या लोकांना जातीची पर्वा नाही. इथे फक्त तीन जाती आहेत: गरीब, शेतकरी आणि महिला’. कंगनाच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेते म्हणाल्या, ‘भाजपची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. एक उच्चवर्णीय स्टार अभिनेत्री आणि खासदार असल्याने तुम्हाला दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि गरीब सामान्य लोकांची स्थिती कशी कळेल? त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या मुद्द्यावर मौन तोडण्याचे आवाहन केले आहे.
कंगनाने रामनाथ कोविंद यांना ‘राम कोविड’ म्हटले!
खासदार कंगना राणौतची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चुकून ‘राम कोविड’ म्हटल्यामुळे तिची खिल्ली उडवली जात आहे. त्यांनी चुकून त्यांना ‘देशाचे पहिले दलित राष्ट्रपती’ म्हटले. एका मुलाखतीत जात जनगणनेबाबत बोलताना कंगनाने हे सांगितले. कंगनाला तत्काळ व्यत्यय आणत अँकर सौरभ द्विवेदी म्हणाले, ‘रामनाथ ‘कोविंद’ हे देशाचे ‘दुसरे’ दलित राष्ट्रपती होते. प्रथम के.आर. नारायणन होते. आपली चूक लक्षात येताच राणौतने माफी मागितली. पण सोशल मीडियावर कंगनाबाबत मीम्सचा पूर आला आहे.
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ वर तेलंगणात बंदी येऊ शकते : अभिनेत्री कंगना रणौत अभिनीत ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शीख समुदायाला दिले आहे.
सरकारचे सल्लागार मोहम्मद अली शब्बीर यांनी ही माहिती दिली आहे. तेलंगणा शीख सोसायटीच्या एका शिष्टमंडळाने शब्बीर यांची भेट घेतली आणि ‘इमर्जन्सी’ चित्रपटात शीख समाजाचे चित्रण ज्या प्रकारे करण्यात आले त्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली.
शिष्टमंडळाने सांगितले की, ‘चित्रपटात शीखांना दहशतवादी आणि देशद्रोही म्हणून दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे समुदायाची प्रतिमा खराब होईल’.
यू-सर्टिफिकेट मिळाले नाही
दरम्यान, अभिनेत्री कंगनाने सांगितले की, चित्रपटाला अद्याप यू-सर्टिफिकेट मिळालेले नाही. सेन्सॉर बोर्ड त्याचा आढावा घेत आहे.