Online shopping । अलीकडच्या काळात Amazon किंवा Flipkart यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत. या प्लॅटफॉर्मवर दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्वच वस्तू उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतात. शिवाय यावर तुम्हाला काही प्रमाणात सवलत देखील उपलब्ध करून दिली जाते.
त्यामुळे ऑनलाइन खरेदीचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच आता सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण रिटर्न अँड रिप्लेस पॉलिसीबाबत काही चर्चा सुरु आहेत. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.
धोरणात बदल
सध्याच्या काळात लाखो लोक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म वापरतात. अशातच आता रिटर्न अँड रिप्लेस पॉलिसीबाबत सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या बातम्यांमुळे अशा अनेकांची चिंता वाढली असून इलेक्ट्रॉनिक वस्तू यापुढे परत केल्या जाणार नाहीत. तुम्हाला त्या सर्व्हिस सेंटरमध्ये न्याव्या लागणार आहेत, असा दावा अशा रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. दाव्यानुसार, यामध्ये मोबाईलपासून एअरपॉड्सपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश केला आहे.
धोरणातील बदलाबाबत Amazon किंवा Flipkart कडून अशी कोणतीही माहिती दिली नाही. दोन्ही साइट्सवर तीच जुनी पॉलिसी दिसत असून ज्यात तुम्ही पाच किंवा सात दिवसांत वेगवेगळी उत्पादने बदलू शकता किंवा परत करू शकता. सध्या अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही मुक्तपणे खरेदी करू शकता.
ज्यावेळी तुम्ही एखादे उत्पादन खरेदी करता, त्यावेळी पैसे देण्यापूर्वी त्याचे परतावा किंवा बदलण्याचे धोरण तपासण्याचे सुनिश्चित करा, अशी काही उत्पादने आहेत जी परत करता येत नाहीत. अशा वेळी विचार करूनच त्यांना ऑर्डर द्या. आपण बहुतेक इलेक्ट्रॉनिक वस्तू परत करू शकता आणि ती खराब झाली तर बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.